लोकसभा निवडणूक मतमोजणीमुळे सातारा औद्योगीक वसाहतीतील वाहतुकीत बदल
Satara News Team
- Sat 1st Jun 2024 11:51 am
- बातमी शेयर करा
![](https://esataranews.com/upload/post/9bdfeb78dd.jpg)
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी दि. ४ जून रोजी सातारा आैद्योगिक वसाहतीतील डीएमओ गोदामात होणार आहे. यामुळे नागरिकांची गर्दी होणार असल्याने गोदाम परिसरात वाहतूक व्यवस्थेत पोलिसांकडून बदल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आदेश काढला आहे. हा आदेश दि. ३ जून रोजीच्या रात्री ११ वाजून ५५ मिनीटांपासून लागू होणार आहे. खालील मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार वेणूगोपल फुडस (पारले कंपनी) ते कवित्सू कंपनी युनीट क्रमांक दोन कंपनीकडे डीएमओ गोदामासमोरुन येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (शासकीय वाहने वगळून) पूर्णत: प्रवेश बंदी असणार आहे. सुटकेस चाैक येथून वेणूगोपाल फुडस कंपनीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना बंदी. अजिंक्यतारा सहकारी कृषी केंद्राकडून कृषीटेक कंपनीमार्गे डीएमओ गोदामाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद असणार आहे. तर भोर फाट्याहून गोदामाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनाही प्रवेश मिळणार नाही.
पार्किंग ठिकाणे निश्चित
- भोर फाटा येथून नवीन आैद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहने रस्त्याच्या बाजुला पार्किग करता येतील.
- जानाई मळाई रस्त्याने निवडणूक मतमोजणी निकालासाठी येणाऱ्या वाहनांना तळ्याजवळील पार्किंगपर्यंत जाता येणार आहे.
स्थानिक बातम्या
लांडेवाडी खून प्रकरणातील संशयित फरारी सरपंचास अटक
- Sat 1st Jun 2024 11:51 am
संगम माहुलीतील मंदिरांच्या पायऱ्यांना टेकले पाणी
- Sat 1st Jun 2024 11:51 am
दहिवडी पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा अवघ्या पाच तासात आणला उघडकीस
- Sat 1st Jun 2024 11:51 am
अनैतिक संबंधाचे तीन बळी...
- Sat 1st Jun 2024 11:51 am
24 जुलै पासून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तालुका निहाय स्पर्धा आयोजन बैठका
- Sat 1st Jun 2024 11:51 am
संबंधित बातम्या
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 1st Jun 2024 11:51 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 1st Jun 2024 11:51 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 1st Jun 2024 11:51 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 1st Jun 2024 11:51 am
-
सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी ,कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प
- Sat 1st Jun 2024 11:51 am
-
सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव (करंजे )अपसंपदेचा गुन्हा दाखल
- Sat 1st Jun 2024 11:51 am
-
बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली शेळी घेऊन बिबट्या पसार
- Sat 1st Jun 2024 11:51 am