आमदार जयकुमार गोरेंवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, याचिकेवर ‘5 जुलैला ’ होणार उच्च न्यायालयात सुनावणी
Satara News Team
- Mon 1st Jul 2024 11:17 am
- बातमी शेयर करा
सातारा प्रतिनिधी | काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 5 जूलैला उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयितांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
आ. गोरेंचा भ्रष्टाचार उघड होऊनही कारवाई नाही
मायणी मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी काढलेली कर्जे भागविण्यासाठी आमदार गोरेंना मेडिकल कॉलेजची भागीदारी देण्यात आली. मात्र, त्यांनी एक रुपयाचेही कर्ज भागविले नाही. उलट दुष्काळी भागात शून्यातून मेडिकल कॉलेज उभारणाऱ्या एम. आर. देशमुखांवरच ईडीने कारवाई केली. वास्तविक, कोरोना काळात आ. गोरेंनी केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड होऊनही त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही, असा आरोप दीपक देशमुख यांनी यापूर्वी केला होता.
संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांना ईडीने केली होती अटक
मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सन २०१२-१३, १३-१४ व १४-१५ या तीन वर्षांतील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश न्यायालयाने अनियमित ठरवून २० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. तो दंड संस्थेकडून वसूल करण्याचे आदेशही शासनास दिले होते. तसेच मेडिकल कॉलेजमध्ये खोटी यंत्रसामुग्री खरेदी दाखवून मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांकडून मेडिकलच्या अॅडमिशनसाठी भरमसाठ पैसे घेतल्याप्रकरणी ईडीने तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुख यांना १० मे २०२२ रोजी अटक केली होती.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 1st Jul 2024 11:17 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 1st Jul 2024 11:17 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 1st Jul 2024 11:17 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 1st Jul 2024 11:17 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 1st Jul 2024 11:17 am
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Mon 1st Jul 2024 11:17 am
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Mon 1st Jul 2024 11:17 am
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Mon 1st Jul 2024 11:17 am
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Mon 1st Jul 2024 11:17 am
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Mon 1st Jul 2024 11:17 am
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Mon 1st Jul 2024 11:17 am
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Mon 1st Jul 2024 11:17 am
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Mon 1st Jul 2024 11:17 am













