पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला माणदेशात येणार ; प्रशासनाचे तयारी सुरू

जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेचे आंधळी धरणामध्ये जलपूजन.

 माण : माण तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असल्याने या कार्यक्रमाच्या नियोजनाची  जयत तयारी प्रशासनाच्या वतीने चालू आहे. 
    गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन (जिहे-कटापूर) योजनेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते आंधळी धरणात पाणी पुजनाने होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुदक्षणा रूपाने दुष्काळी भागाला ही भेट देणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रशासन गतिमान सूक्ष्म नियोजन करण्याचे काम सुरू आहे. 
    
     गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन जिहे-कठापूर योजनेला गती यावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातून या योजनेला निधी दिला राज्य शासनाने ही निधी उपलब्ध करून दिला यामुळे दुष्काळी मान- खटाव तालुक्यातील जनतेला मोठा आधार मिळाला आहे. जिहे-कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आले असून धरण भरल्यावर नदीवरील 30 पेक्षा जास्त बंधाऱ्यात पाणीसाठा केला जाणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी आमदार जयकुमार गोरे  व  प्रशासनाच्या वतीने सुरू केली असून सात हेलीपॅड बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आंधळी धरणाची व परिसराची मोठी स्वच्छता सुरू आहे पाणी पूजन झाल्यानंतर धरणाचे शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.        

       गुरुवारी या परिसराची पाहणी मुख्यमंत्र्याचे स्वीय सहायक सचिन जोशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, आमदार जयकुमार गोरे यांनी परिसराचा पाहणी व आढावा घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त