समाजाशी एकरूप होऊन कर्मचाऱ्यांनी व्यक्तिमत्व फुलवावे : यशेंद्र क्षीरसागर
Satara News Team
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
- बातमी शेयर करा
सातारा: कर्मचाऱ्यांनी एककल्ली कोशात न राहता समाजातील विविध क्षेत्रांकडे सजग नजरेने पहावे. आपल्या कार्य बाहुल्यातून वेळ काढून विविध क्षेत्रात रस घ्यावा. जेणेकरून व्यक्तिमत्व सर्वांगीण होईल"असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, साहित्यिक, कोरेगाव पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे आयोजित दोन दिवसीय 'प्रशासकीय व आर्थिक मार्गदर्शन कार्यशाळे'मध्ये 'व्यक्तिमत्व विकास आणि आपला समाज' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखा अधिकारी विजय गायकवाड, आशा कर्मचारी समन्वयक अण्णासाहेब जगताप तसेच जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा यशोदा इंजीनियरिंग कॉलेजमध्ये संपन्न झाली. श्री क्षीरसागर म्हणाले,"बहुविध वाचन आणि चिंतन यामधून व्यक्तिमत्व विकास फुलतो. संत, समाजसेवक, समाजसुधारक यांच्या जीवन कार्याचा अभ्यास कर्मचाऱ्यांनी वेळात वेळ काढून करावा. त्यामुळे केवळ ज्ञानवृद्धी होते असे नव्हे; तर आपल्या समस्यांचे उत्तर देखील अशा महान व्यक्तींच्या कार्यातून आणि चरित्रातून आपल्याला मिळते. नोकरी करीत असताना ती आनंदाने करण्यासाठी माफी, अभिनंदन आणि आभार या तत्त्वांचा अवलंब करावा. त्यामुळे नम्रता भाव निर्माण होतो आणि मन शुद्धीकरण होते. इतरांचे सहकार्य देखील त्यामुळे मिळते." द्या म्हणजे मिळेल" म्हणजेच दानाचे महत्त्व तसेच; "मांगल्याचा प्रसार" म्हणजेच चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करणे ;या दोन मूल्यांचा अंगीकार करावा. त्यामुळे वातावरणात सहकार्य आणि पावित्र्य यांचा संगम होतो. दैनंदिन कामकाजात कितीही ताणतणाव असले तरी बहुविध वाचन आणि नम्रता भाव यामुळे दैनंदिन कामकाज आनंदमय होते." संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यातील काही दाखले देत श्री. क्षीरसागर यांनी आपल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण केले. श्री. अण्णासाहेब जगताप यांनी सूत्रसंचालन केले.श्री. विजय गायकवाड यांनी आभार मानले
स्थानिक बातम्या
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 15th Jun 2023 04:35 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 15th Jun 2023 04:35 pm













