साताराच्या आदितीचा सातासमुद्रापार झेंडा तिरंदाजीतील भारतीय संघाला सांघिक सुवर्ण यश
Satara News Team
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुक्यातील शेरेवाडी या छोट्याशा गावातील आदिती स्वामीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक आटकेपार नेला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १२ व्या दिवशी भारताने तिरंदाजीत महिला कंपाऊंड सांघिकमध्ये सुवर्णवेध साधला. त्यामध्ये आदिती स्वामीचे यश झळाळून निघाले. तिने ज्योती वेण्णम, प्रणित कौर यांच्यासोबतीने चायनीज तैपईच्या महिला संघाला २३०-२२८ असे हरवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीच्या या यशाने सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा दबदबा आणखी वाढला असून आता लक्ष तिच्या वैयक्तिक कामगिरीकडे लागले आहे.
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत विजेतेपद मिळवून आदिती स्वामीने यापूर्वीच जगाच्या नकाशावर नवा इतिहास लिहिला आहे. आदितीच्या कामगिरीमुळे जगभरात भारतासह महाराष्ट्राचे नाव उंचावले असताना आदितीने गुरुवारी आपल्या सुवर्णमय कामगिरीचा सिलसिला कायम राखला. हाँगझोऊ या ठिकाणी सुरू असलेल्या एकोणीसाव्या एशियन गेम्स धनुर्विद्या (तिरंदाजी) स्पर्धेमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली.
आशियाई स्पर्धेत सांघिकमध्ये आदितीच्या सुवर्णमय कामगिरीबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
स्थानिक बातम्या
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Fri 6th Oct 2023 01:28 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Fri 6th Oct 2023 01:28 pm












