सातारा पोलिसांची धडक कारवाई; बेकायदा गुटखा साठ्यासह ३६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा : बनावट गुटख्यासह महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा (विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू व आर.एम.डी) वगैरे असा एकुण ३६ लाख ३९ हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे. 
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अजित बोहाडे यांनी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतुक करणान्या व बाळगणान्या इसमांची माहिती काडुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या आहेत.
  शनिवार दिनांक ५ / ११ / २०२२ रोजी श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इनोव्हा कार क्र. एम.एच.१२ ई एम / १८८३ मधुन महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा बावधन नाका वाई येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे बावधन नाका वाई येथे सापळा लावून थांबले असताना सकाळी ०६.०० वा. चे सुमारास बातमीतील इनोव्हा कार बावधन नाका येथे आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर इनोव्हा कार ताब्यात घेतली असता त्यामध्ये ५ लाख ७५ हजार ८४०/- रुपये किंमतीचा गुटखा (विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू व आरएमडी) मिळुन आला. सदर चालकाच्या ताब्यात एकुण १० लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार व वरील किमतीचा गुटखा असा एकुण १५ लाख ७५ हजार ८४० रुपयेचा माल मिळून आला.
  त्यानंतर सुरूर ता. वाई जि.सातारा येथे इनोव्हा कार क्रमांक एम.एच.०१ ए एम / ४५३७ यामधुनही महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सुरूर फाटा ता. वाई या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक सापळा लावून थांबले असता दिनांक ५/११/२०२२ रोजी सकाळी ०८.५० वा. चे सुमारास सदर ठिकाणी बातमीतील इनोव्हा कार आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर इनोव्हा कार ताब्यात घेतली असता त्यामध्ये ४ लाख ७५ हजार ९७२ रुपये किंमतीचा गुटखा (विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू व आरएमडी) मिळुन आला. सदर चालकाच्या ताब्यात एकुण १० लाख रुपये किमतीची इनोव्हा कार व वरील वर्णनाचा गुटखा असा एकुण १४ लाख ७५ हजार ९७२ रुपयेचा माल मिळून आला आहे.
   त्यानंतर चारभिंती सातारा येथे रिक्षा क्रमांक एम.एच.११ सी.जे. २५०५ मधून ३ इसम बनावट आर. एम. डी. गुटखा घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्याठिकाणीही स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने सापळा लावुन दिनांक ५ / ११ / २०२२ रोजी दुपारी १२.५० वा. वे सुमारास सदर ऑटो रिक्षा त्यामधील ३ इसमांसह ताब्यात घेतली. त्यांचे ताब्यात १ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा बनावट गुटखा (आरएमडी पान मसाला) मिळुन आला. ऑटोरिक्षामधील ३ इसमांकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा बनावट गुटखा तृप्ती चायनीज सेंटरचे मालक वैभव पावसकर यांनी त्यांच्या चायनीज सेंटरमध्ये मशीनवर बनवला असल्याचे सांगीतले. म्हणुन लगेचच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना बोलावुन वरील दोन्ही इनोव्हा कारमधील तसेच ऑटोरिक्षामधील प्रतिबंधीत मुददेमाल जप्त करुन तृप्ती चायनीज सेंटरवर देखील छापा टाकला असता त्या ठिकाणी २ लाख रुपये किंमतीची "ब्लेंडीग अॅण्ड पॅकिंग मशीन" मिळुन आली. ती जप्त करण्यात आली असुन बनावट गुटखा बनवणारा वैभव पावसकर यास देखील ताब्यात घेतले आहे.
   अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रतिबंधीत गुटख्याच्या बाबतीत विशेष मोहिम राबवुन एकाच दिवसात तीन ठिकाणी गुटख्याची कारवाई करुन १२ लाख ३९ हजार १२ रुपयेचा प्रतिबंधीत गुटखा, २ इनोव्हा कार, १ ऑटोरिक्षा व बनावट गुटखा तयार करण्याचे “ब्लेंडीग अॅण्ड पॅकिंग मशीन" असा एकुण ३६ लाख ३९ हजार १२ रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. सदर बाबत अनुक्रमे वाई पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाणे तसेच सातारा शहर पोलीस ठाणे येथे संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
   सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या सूचनाप्रमाणे व श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या अधिपत्याखाली सपोनि रमेश गर्जे, पोउनि मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाने, चापोहवा शिवाजी गुरव तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडील निरीक्षक इम्रान हवालदार, रोहन शहा व श्रीमती वंदना रुपनवर यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

 

कारवाई केलेल्या आरोपींची नावे दीपक राजगोंडा पाटील (वय 36 वर्षे रा शिरदवाड ता निपाणी जि बेळगाव राज्य कर्नाटक - इनोव्हा क्र MH  12 इ एम 1883 चा चालक), ललित सुमेरमल काछीया (वय 56 वर्षे रा सुरूर ता वाई जि सातारा- इनोव्हा क्र MH  01 ए  एम 4537 चा चालक), तेजस दीपक हरिहचंद्र अवघडे (वय 22 वर्षे, - रिक्षा क्र MH  11 C J  2505 चा चालक), आदित्य हरिश्चंद्र अवघडे (वय 22 वर्षे रा 61 दुर्गापेठ सातारा- आरोपी क्र 3 याचा भाऊ), अनुष चिंतामणी पाटील (वय 19 वर्षे रा गुरुवार पेठ सातारा- आरोपी क्र 6 चा भाचा), वैभव रवींद्र पावसकर (वय 35 वर्षे रा शुक्रवार पेठ सातारा - तृप्ती चायनीज मालक बनावट गुटखा तयार करणारा) यांचा समावेश आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला