लक्ष्मणतात्या म्हणजे राज्यातील कार्यकर्त्यांचे विद्यापीठच : अनिल बोधे

वाई : तात्यांच्या मार्गदर्शनातून व तात्यांच्या सहवासातून या जिल्ह्यातील राजकारणाची फार मोठी फळी निर्माण झाली आहे.. तात्यांना  कार्यकर्त्यांच्या बाबतीत सीमेचे कोणतेही बंधन नव्हते . संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात तात्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे पसरले आहे असे उद्गार प्रा. अनिल बोधे यांनी काढले. ते बोपेगाव ता. वाई येथील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामराव पाटील माध्यमिक विद्यालय बोपेगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि विरोधकांनी सुद्धा नतमस्तक व्हावे असे तात्यांचे कार्य होते. तात्या हे परखड विचारांचे होते प्रसंगी कटू बोलतील परंतु कार्यकर्त्यांच्याबाबत त्यांना तळमळ होती त्यामुळे विरोधकसुद्धा नेहमी त्यांचा आदर करीत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले कि तात्यांनी असंख्य कार्यकर्ते घडविले आजची वाई तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची फळी ही तात्यांच्याच माध्यमातून राजकारणात यशस्वी झाली आहे. महादेव मस्कर म्हणाले कि राजकारणातील आमचा श्रीगणेशा तात्यांचे शिकवणीने झाला. तात्या हेच आमच्यासाठी आदर्श व राजकारणात तात्या सांगतील तीच आमची पूर्व दिशा होती. आमच्या जडणघडणीत तात्यांचे मोलाचे योगदान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे चेअरमन विठ्ठल शिंदे यांनी केले तर आभार प्रमोद शिंदे यांनी मानले.
      कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील, मिलिंद पाटील, प्रकाश पाटील, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मस्कर, कांतीलाल पवार, शशिकांत पवार, श्रीकांत वीर, सत्यजित वीर, अनिल जगताप, किरण काळोखे, उदयदादा पिसाळ, मधुकर भोसले, माधवराव डेरे, कृष्णराव डेरे, मधुकर डेरे, रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, प्राथमिक शाळा बोपेगावचे शिक्षक व विद्यार्थी तसेच बोपेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण शिंदे, बोपेगाव सोसायटीचे उपाध्यक्ष महेश जाधव, वाई तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते तसेच बोपेगाव व कवठे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला