साताऱ्यात फुटक्या तलावातील हजारो मासे मृत

सातारा : साताऱ्यातील फुटक्या तलावातील हजारो मासे आज, बुधवारी सकाळी अचानक मृत्युमुखी पडले. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने तलावातील मासे तातडीने बाहेर काढले. तब्बल दोन ट्रॉली माशांची पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत विल्हेवाट लावण्यात आली. 

तलावातील मासे मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृत मासे पाहण्यासाठी सकाळी नागरिकांची तळ्याभोवती गर्दी जमली. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त