ओम कदम याला राष्ट्रीय शालेय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक
Satara News Team
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
- बातमी शेयर करा
सातारा : अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाहूनगर शेंद्रे येथील इ. १२ वीचा विद्यार्थी ओम अनिल कदम याने गुजरात मधील नाडियाड येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेच्या कंपाउंड या प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळवले.
ओम कदम हा इ. सहावी पासून आर्चरी या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घेत असून त्याने आजवर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केलेले आहे. त्याने शालेय राष्ट्रीय आर्चरी क्रीडा स्पर्धेत केलेली कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आहे. या यशाबद्दल त्याचे अजिंक्यतारा शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौतुक व अभिनंदन केले, तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ओम कदम याचा संस्थेचे अध्यक्ष यशवंत हरी साळुंखे, उपाध्यक्ष नामदेवराव सावंत, सर्जेराव सावंत, संचालक सुनील निकम, इंद्रजीत नलवडे व संस्थेचे सेक्रेटरी जिवाजी मोहिते या सर्वांनी त्याचे व त्याचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक पांडुरंग कणसे व त्याच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. ओमने आपले मनोगत व्यक्त करताना आपला खडतर प्रवास विषद केला. पांडुरंग कणसे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी मोरे यांनी प्रास्ताविक केले. संतोष मोरे यांनी सूत्रसंचालन तर, सौ धनश्री शिंदे यांनी आभार मानले.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Fri 22nd Dec 2023 12:10 pm













