वाई तालुक्यातील कळंभे येथे तुषार शिवथरे यांनी रोवली आपल्या यशस्वी वाटचालीची मुहूर्तमेढ
बापू वाघ - Wed 25th Oct 2023 12:35 pm
- बातमी शेयर करा
कळंभे : वाई तालुक्यातील कळंभे येथे शिवन्या शुद्ध गावरान चिकन या दुकानाचे उद्घाटन
दसऱ्याच्या मुहूर्तावर संपन्न झाले
ग्राहक आणि व्यावसायिक यांचं खरं नातं हे विश्वासावर अवलंबून असते, आणि हा विश्वास व्यावसायाला तेव्हाच विशेष उंची देतो तेव्हा ग्राहक पूर्णपणे समाधानी असतो,
आणि या समाधानाचे, विश्वासाचे आणि सेवेचे व्रत हाती घेतले आहे, मु पो-कळंभे, ता.वाई येथील युवा उद्योजक श्री तुषार अरुण शिवथरे यांनी.
त्यांच्या या उद्योगास माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत
अशी प्रतिक्रिया या उद्घाटन प्रसंगी युवा उद्योजक श्री संदीप वाघ यांनी व्यक्त केले
धावपळीच्या जीवनात प्रत्येकाची वाटचाल आता गतिमान झाली आहे,
वेळेअभावी प्रत्येकजण उपलब्ध बाजारात असणाऱ्या मालाचा नाईलाजास्तव विचार करून वेळ मारून नेत असतो, त्यावेळी वेळ भागली असली तरी ग्राहकांचे मन तितकेच समाधानी नसते,
वाढते प्रदूषण, धावपळीच जग हा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे, आणि तो चालतच राहणार, पण त्यासाठी आपल्याला मिळणारा आहार तितकाच महत्त्वाचा आहे,
आणि तो किती खात्रीशीर शुद्धतेचा मिळणार याची आज तर काळाची गरज आहे, हेच ओळखून या युवाउद्योजकाने दूरदृष्टी पाऊल टाकत सर्वांना शुद्ध गावरान चिकन, अंडी देण्याच विडा उचलला आहे.
पोल्ट्री ते ग्राहक या धोरणावर सर्वांना सेवा देऊन किफायतशीर दरात ग्राहकांचे समाधान राखलेच पाहिजे, आणि त्यामध्ये देशीवाण जपले तर विश्वास हा अजरामर राहील हेच ओळखून तुषार शिवथरे यांनी कळंभे येथे मुक्त पोल्ट्री पद्धत अवलंबली आहे, यामध्ये धान्य, भाजीपाला खाद्याबरोबर ऊन, वारा
आणि पाऊस या वातावरणाचा सहवास या पक्षांना मिळाला पाहिजे तरच जातीवंत देशीवाण निर्माण होतील आणि त्यांचे मांस, अंडी ग्राहकांच्या आहारविहारा याबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठी हितकारक ठरतील
हिच व्यावसायिक सेवा होईल म्हणून मुक्त पोल्ट्री फार्म अगदी बघण्याजोगा आहे.
आमची बारमाही सेवा चालू राहणार असल्याचे श्री तुषार शिवथरे यांनी यावेळी सांगितले
आहे शिवन्या शुद्ध गावरान चिकन दुकानाचे उद्घाटन कळंभे गावचे सुपुत्र युवा उद्योजक श्री संदीप किसन वाघ व वाई तालुक्याचे युवा नेते श्री हणमंतराव गायकवाड विकास सेवा सोसायटी चेअरमन श्री विश्वनाथ शिवथरे मा चेअरमन डॉ श्री तानाजी शिवथरे मा व्हाचेअरमन श्री दत्तात्रेय शिवथरे श्री संतोष गायकवाड श्री आनंदराव नलावडेश्री विजय शिवधरे श्री राजेश मोहिते( पाटील) यांच्या हस्ते संपन्न झाला
यावेळी सुनील मापारी जितेंद्र गायकवाड (पाटील) श्री यशवंत शिवथरे प्रदीप शिवथरे अमर पनवेलकर नितीन शिवथरे करण शिवथरे कुमार शिवथरे अनिश गायकवाड ऋषिकेश गायकवाड तसेच गावातील तरुण मंडळातील असंख्य कार्यकर्ते या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 25th Oct 2023 12:35 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 25th Oct 2023 12:35 pm













