आजी-आजोबानी घेतला नातवांच्या शाळेत बालपणीचा आनंद

सातारा : सातारा येथिल रयत शिक्षण संस्था  सातारा प्रायमरी स्कुल सातारा येथील   स्कूलमधील नातू-नातीच्या जिव्हाळाचे उपक्रमात सहभागी झालेले आजी-आजोबा नातवांच्या शाळेत रमून गेले. अगदीच बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्या नातवांसोबत सारे आजी आजोबांनी खेळ तसेच जुन्या गाण्याचाही आनंद घेतला.
वृध्दापकाळ म्हणजे फिरून आलेले बालपण, या वयात आजी आजोबांना गरज असते ती प्रेमाची, आपुलकीची, आधाराची व जिव्हाळ्याची,रयत शिक्षण संस्था प्रचलित सातारा प्रायमरी स्कुल सातारा येथील स्कूलच्यावतीने पहिली ते नववीच्या  विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांसाठी ह्या वर्षी 'जिव्हाळा' उपक्रम राबविण्यात आला. यावर्षीच्या कार्यक्रमात सातारा प्रायमरी स्कुल सातारा  चे मुख्याध्यापक धनंजय पवार हे नेहेमीच  'जिव्हाळा' उपक्रम राबवताना दिसत असतात. या वेळी त्यांना नेहमीच साथ देणाऱ्या त्याच्या शिक्षक स्टाफ  सौ वर्षा साळुंखे   सौ.शेलार, श्रीमती.लोटेकर,  सौ.भागवत, सौ. मुल्ला, सौ. जुनघरे मॅडम तसेच कांबळे सर व कणसे सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडून तसेच प्रमुख पाहुणे डॉ. अभिजित गुरव उपस्थित होते.  यावेळी शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश करताना आजी-आजोबांचे रयत शिक्षण संस्था सातारा यांनी आजी आजोबांचे स्वागत करताना विद्यार्थी,विदयाथ्यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. अत्यंत भावनिक वातावरणात कार्यक्रम झाला. आमची नातवंडे योग्य व्यक्तीच्या छत्रछायेत वाढत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. स्कूलने या उपक्रमांतर्गत आम्हाला शाळेत बोलावून मान सम्मान दिला तसेच आपुलकीने विचारपूस केली, यामुळे आम्ही भारावलो आहोत. 
 शाळेच्यावतीने गुलाबपुष्प देऊन व आजी आजोबांचे स्वागत करण्यात आले.आजीआजोबांनी नातवांसोबत विविध बैठ्या खेळांमध्ये सहभाग घेतला. विद्याथ्यांनी संगीत साहित्याच्या माध्यमातून जुन्या । काळातील गाणी प्रस्तुत केली. अशा रीतीने सातारा प्रायमरी स्कूल ने आजी आजोबांचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहाने संपन्न केला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला