स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची विक्रमी कामगिरी.आंतरराज्यीय के.टी.एम. गँग जेरबंद करून १०३ तोळे सोन्याचे दागिने व ५ किलो चांदी असा एकुण ६७ लाख १९ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

सातारा  :  मार्च २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीमध्ये सातारा जिल्हयातील मेढा, मल्हारपेठ, वाई, सातारा तालुका, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई, वाठार, उंब्रज, व वडुज या भागामध्ये दोन ते तीन के. टी.एम. मोटार सायकलवरुन ६ ते ७ जण येवून घरफोडया चोऱ्या करुन पळून जात होते या गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सदरची के. टी. एम. गँग पकडण्याच्या सूचना दिल्या. सदर के.टी.एम. गँगने सातारा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली जिल्हयातही तसेच कर्नाटक व गुजरात राज्यात मोठया प्रमाणात घरफोडया चोऱ्या केल्या असल्याने गँगला पकडण्याचे मोठे आव्हान सातारा जिल्हा पोलीस दलासमोर होते.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सदर गँगला पकडण्याकरीता सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली तपास पथके तयार केली होती.
तपास पथकांनी के.टी.एम. गँगची गुन्हे करण्याच्या पध्दती बाबत अभ्यास करून माहीती घेतली असता सदरच्या गँगने सातारा जिल्ह्यात दोन ते तीन मोटार सायकलवर येवून एका रात्रीमध्ये सुमारे ८ ते १० बंद असलेल्या घरांच्या घरफोडी चोरी करुन १२० ते १४० कि.मी. च्या भरधाव वेगाने धूम स्टाईलने पळून जात होते. त्यामुळे सदर आरोपींबाबत काहीएक माहिती प्राप्त होत नव्हती. त्यामुळे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी एक गोपनिय बातमीदार तयार करुन त्यास पौंड, यवत परिसरात ठेवून सदर टोळीच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले होते. नमुद बातमीदार सलग ३ महिने गँगच्या हालचालीवर पुणे, पौड, यवत, मुळशी परिसरात लक्ष ठेवून होता व त्यांची माहिती वेळोवेळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना देत होता.
ऑगस्ट २०२३ मध्ये बातमीदाराने के. टी. एम. गँगमधील ३ आरोपी पौड परिसर जि. पुणे येथे असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली त्याप्रमाणे त्यांनी भुईंज पोलीस ठाणेचे सपोनि रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमि पाटील यांचे तपास पथकांना नमुद आरोपींचा पौड जि. पुणे येथे जावून त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद तपास पथकांनी पौड ता. मुळशी, जि. पुणे येथील डोंगर दऱ्यांमधील परिसरामध्ये भर पावसात सापळा लावून १) सुरदेव सिलोन नानावत वय ३३ वर्षे रा. घोटावडे ता. मुळशी जि. पुणे २) राम धारा बिरावत वय ३८ वर्षे रा. करमोळी पो. पौड ता. मुळशी जि. पुणे ३) परदुम सिलोन नानावत वय २५ वर्षे रा. घोटावडे ता. मुळशी जि. पुणे या आरोपींनी पावसाळी वातावरणाचा फायदा घेवून पथकाच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करुन जबर प्रतिकार केला असता त्यांना कसोशीने प्रयत्न करून शिताफिने त्यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. नमुद आरोपींना भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं. २९६ / २०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० या गुन्हयामध्ये अटक करुन त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेतली. पोलीस कोठडी मुदतीत आरोपींच्याकडे त्यांना विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्यांनी सातारा तालुका, मेढा, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई, वाठार, उंब्रज, मल्हारपेठ, वडुज, कराड तालूका पोलीस ठाणे हद्दीत माहे मार्च २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत घरफोड करुन सोन्या, चांदीचे दागिणे व रोख रकमा चोरी केल्या असल्याचे सांगून सदरची सोन्या चांदीचे दागिणे हे अहमदाबाद राज्य गुजरात येथील एका महिला सोनार हिस तसेच सोनपालसिंग नारायणसिंग रजपूत व प्रदिप आसनदास खटवानी यांना विकले असल्याचे सांगीतले. आरोपींनी दिलेल्या माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक तात्काळ अहमदाबाद राज्य गुजरात येथे रवाना झाले व तेथून महिला सोनार व प्रदिप आसनदास खटवानी यांना ताब्यात घेतले व दोघांनाही सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
गुन्हयातील निष्पन्न झालेल्या सर्व आरोपींना ताब्यात घेवून देखील घरफोडी चोरीमधील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होत नसल्याने मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे समोर होते. दरम्यान नमुद आरोपींना त्यांनी केलेल्या इतर गुन्हयाचे तपासकामी गुन्हयांमध्ये वर्ग करुन त्यांचेकडे तपास सुरु होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी आरोपींच्या साथीदारांबाबत गोपनिय माहिती घेतली असता त्यांना अशी माहिती प्राप्त झाली की, वामन नंदू राठोड रा.फंडवस्ती रांजनगाव जि. पुणे, व वाल्मीक रामभाऊ शेखावत, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे हे वर नमुद मुख्य आरोपींच्या नेहमी संपर्कात होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि सुधीर पाटील व पोउपनि विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली सुधीर बनकर, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, अजित कर्णे, सनी आवटे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक यांचे तपास पथक तयार केले. नमुद आरोपींना ताब्यात घेतल्यापासून वामन राठोड हा गुजरात येथे पळून गेला होता. त्या अनुषंगाने नमुद तपास पथकाने आरोपी वामन नंदू राठोड व वाल्मीक रामभाऊ शेखावत यांच्या ठावठिकाणाची गोपनिय माहिती प्राप्त करुन त्यांना बोरगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ९९/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० या गुन्हयाचे तपासकामी अटक केली. त्यांना मा. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी मंजूर केली. पोलीस कोठडी मुदतीत नमुद आरोपींकडे गुन्हयात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांबाबत सखोल विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, आरोपी १) सुरदेव सिलोन नानावत, २) राम धारा बिरावत, ३) परदुम सिलोन नानावत यांनी सातारा जिल्हयातील सातारा तालुका, मेढा, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई, वाठार, उंब्रज, मल्हारपेठ, वडुज, कराड तालूका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडया करुन चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिणे माझ्या मदतीने गुजरात येथील सोनारांचेकडे गहाण ठेवले असल्याचे सांगीतले.
त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी तपास पथकासह पुन्हा गुजरात राज्यात जावून आरोपींनी सोने ज्या सोनारांकडे गहाण ठेवले होते त्या सोनारांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले सोन्या चांदीच्या दागिण्यांपैकी, चालू बाजारा भावाप्रमाणे ६३,३०,५८०/- रुपये किंमतीचे १०३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ३,८८,५००/- रुपये किंमतीचे ५ किलो वजनाचे चांदीचे दागीने हस्तगत करुन सातारा जिल्हयातील मुद्देमाल परराज्यात गुजरात येथे जाऊन हस्तगत करण्याची विक्रमी कामगिरी केलेली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी माहे नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, असे एकुण ११५ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ३३८ तोळे सोने (३ किलो ३८० ग्रॅम ) असा एकुण २,०६,१८,०००/- (दोन कोटी सहा लाख अठरा हजार रुपये) व ४,४४,०००/- रुपये किंमतीचे ६ किलो वजनाचे चांदीचे दागिने, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
-:सातारा जिल्हयातील उघड केलेले गुन्हे:- गु.र.नं.व कलम
८६/२०२३ भादविक ४५७, ३८०
अ.क्र.
पोलीस ठाणे
१. मेढा
२. भुईंज
३. मेढा
4 .खंडाळा
५. खंडाळा
९७ / २०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०
२९६/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०, ३४, ४११ १३५/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०, ४२७
०४/२०२३ भादविक ४५७, ३८०
६. सातारा तालूका
७.सातारा तालुका
८.सातारा तालूका
९.सातारा तालुका
१०.सातारा तालूका
११. वडुज
१२.वाठार
१३.उंब्रज
८२/२०२२ भादविक ४५७, ३८०
३९०/२०२२ भादविक ४५४, ४५७, ३८० ७९/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० ५३७/२०२२ भादविंसक ३८०, ४५४, ४५७, ५११ ५३८/२०२२ भादविक ४५४, ४५७, ३८० ४३६/२०२२ भादविक ४५४, ४५७, ३८० २८६/२०२२ भादविक ४५७, ३८०
२४४/२०२३ भादविक ४५७, ३८०


१४. उंब्रज
३५३/२०२२ भादविक ४५७, ३८०
१५. बोरगाव
१८८/२०२२ भादविक ४५४, ४५७, ३८०
१६.बोरगाव
१७. बोरगाव
१८९/२०२२ भादविक ४५४, ४५७, ३८० १९/२०२३ भादविक ४५७, ३८०१८. वाई
१९. ५७२/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० ३६४/२०२२ भादविक ४५४, ४५७, ३८०, ४२७
२०. शिरवळ
१०१/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०
२१.शिरवळ
१४५/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०
२२.शिरवळ
२३.मल्हारपेठ
२०६/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० १०६/२०२२ भादविक ४५७, ३८०
२४. मल्हारपेठ
२५.मल्हारपेठ
२६.कराड तालुका
२७.कराड तालूका
१३५/२०२२ भादविंसक ४५४, ४५७, ३८०, ५११
९०/२०२२ भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ ३८६ / २०२३ भादविंसक ४५७, ३८०
३८७/२०२३ भादविंसक ४५७, ३८०
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, भुईंज पोलीस ठाणेचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अमोल माने, अजित कर्णे, मुनिर मुल्ला, राकेश खांडके, सनी आवटे, हसन तडवी, अरुण पाटील, शिवाजी भिसे, राजु कांबळे, अर्जुन शिरतोडे, अमित माने, मनोज जाधव, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, केतन शिंदे, सचिन ससाणे, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, दलजीत जगदाळे, पंकज बेसके, संभाजी साळुंखे महिला अंमलदार दिपाली यादव, यश्वदा मोरे, मोनाली निकम, शकुंतला सणस, अधिका वीर, प्रिती पोतेकर, मोनाली पवार, काजल साबळे, अनुराधा सणस सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, फॉरेन्सिक विभागाचे सपोनि रुपाली मोरे, सपोनि विजय जाधव, गजानन तोडकर, मोहन नाचण, राजीव कुंभार, अमोल जाधव, अनिल खटावकर, अमोल निकम, रुद्रायण राऊत यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त