हुतात्मा परशुराम विद्यालयातील विध्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पैश्यांनी भरलेली पिशवी बस कंडक्टरकडे सुपूर्द

वडूज : हुतात्मा परशुराम विद्यालयातील इयत्ता नववी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सिद्धी सदाशिव जाधव मुळगाव खबालवाडी तालुका खटाव या गावांमधून शिक्षणासाठी बस्ती सोय नसल्यामुळे ही विद्यार्थिनी तिच्या मामाकडे रेवन्नाथ इंगळे राहणार शिरसवडी यांच्याकडे राहून दररोज गोपुज ते वडूज असा बसले प्रवास करते आज शनिवार सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी आठ वाजता गोपुज मध्ये येणाऱ्या कराड वडूज बस मध्ये ती बसली ज्या आसनावरती ती बसली त्या शेजारी तिला एक पैशाने भरलेली पिशवी सापडली आपल्या जवळचे शाळेचे दप्तर बाजूला ठेवून त्या मुलीने ती पैशाची पिशवी त्या बसचे कंडक्टर दीक्षित यांच्याकडे जमा केली त्या बसचे ड्रायव्हर हरिभक्त परायण तुळशीराम रणसिंग या दोघांनी या दोघांनी बस वडूज स्टॅन्ड ला आल्यानंतर ही बाब कंट्रोलर यांच्या कानावरती घातली ती पैशाची बॅग त्यांनी वडूज डेपोचे कॅशियर तोरणे साहेब यांच्याकडे जमा केलेली आहे एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी पाचशे शंभर दोनशे रुपयांच्या नोटांनी भरलेली पिशवी सापडली असताना अजिबात मोह न दाखवता ज्याचे पैसे हरवले आहेत त्याला ते मिळावेत या उद्देशाने सिद्धी जाधव ने प्रामाणिकपणा दाखवला एखाद्या विद्यार्थ्याला विद्वत्ता किती यापेक्षा त्याच्यावर संस्कार किती चांगले करावेत याला महत्व देणारे हे हुतात्मा परशुराम विद्यालय निश्चितच कौतुकास पात्र आहे
 या मुलीच्या प्रामाणिकपणाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य महेश शामराव गोडसे उप मुख्याध्यापक फडतरे सर पर्यवेक्षिका बीएस माने मॅडम विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांना एकत्र करून सर्वात समक्ष या विद्यार्थिनींच्या प्रामाणिकपणाबद्दल   शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  यावेळी हिंदी विभागाचे प्रमुख श्री धुळप  सर यांनी या विद्यार्थिनी 100 रुपयाचे पारितोषिकही दिले
     या विद्यार्थिनीचे वर्गशिक्षक शिवशंकर बाळकृष्ण चव्हाण यांनी वर्गामध्ये या मुलींचा एकत्रित सत्कार केला
 हुतात्मा परशुराम विद्यालयातील एनसीसी अधिकारी चिप ऑफिसर राजेंद्र जगदाळे यांनी दहिवडी आगार आणि वडूज यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता वडूज आगारातील अधिकारी तोरणे साहेब यांच्याकडून समजलेल्या माहितीनुसार या पिशवीमध्ये दहा हजार चारशे तेवीस रुपये होते एवढी मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या विद्यार्थिनीचा विद्यालयामध्ये प्राचार्य महेश रामराव गोडसे यांच्या हस्ते सत्कार झाला

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त