'आम्ही गिरगावकर' समूहाचा सातारा जिल्ह्यात उपक्रम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा नि:शुल्क रंगवून देणार

सातारा : जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागातील मराठी शाळांत शिक्षण घेण्यासाठी मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळेच्या भिंती बोलक्या होणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील ५०० शाळांमध्ये 'रंग दे माझी शाळा' हा उपक्रम राबवणार असून, संबंधित शाळा नि:शुल्क रंगवून देत असल्याची माहिती 'आम्ही गिरगावकर' या समूहातील गौरव सागवेकर, मिलिंद वेदपाठक, शिल्पा नायक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आम्ही गिरगावकर समूहाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमाबाबत माहिती देताना ते म्हणाले, आमच्या समूहाच्या वतीने 'बाळासाहेब ठाकरे व अटलजी आरोग्य योजना', 'रंग दे माझी शाळा', 'सायकल वारी', 'मराठी उद्योजक चळवळ' असे उपक्रम राज्यभर राबवत आहोत.

राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. शौचालये नाहीत, भिंतींची पडझड झाली आहे. त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. मुंबईच्या विकासासाठी १७०० कोटी दिले जातात. मात्र, या शाळांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी निधी दिला जात नाही. मराठी शाळांमध्ये सुविधा नसतील तर मुले या शाळांमध्ये जाणार नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून, त्यासाठी राज्यपालांची भेटही घेणार आहोत.

राज्यात ५०० शाळा रंग देवून बोलक्या करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पाटण तालुक्यातील गायमुखवाडी, जळव येथील जिल्हा परिषद शाळांना रंगरंगोटी केली आहे. तसेच अन्य शाळांमध्येही करणार आहोत. तशी गरज असलेल्या शिक्षकांनी आमच्याशी संपर्क साधून शाळेबद्दल माहिती द्यावी, त्यासाठी आम्ही मदत करणार असल्याचे गौरव सागवेकर यांनी सांगितले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला