कॅबिनेटमध्ये शंभूराज ओकेच,  भाजपमध्ये रस्सीखेच? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  नव्या मंत्रिमंडळात बंडखोरांच्या यादीत आघाडीवर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट "ओके मध्येच" फिक्स असल्याचे निश्चित आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे जयकुमार गोरे यांच्यात रस्सीखेच होणार की दोघांना संधी मिळणार याबाबत सातारा जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

सातारा न्यूज : महाविकास आघाडीचे सरकार घालवण्यासाठी शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत बंडखोरी केली. या बंडखोरीत प्रमुख भूमिका आ. शंभूराजे देसाई यांनी बजावले असल्याचे अनेकदा दिसून आले. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना शंभूराज देसाई यांचाच उल्लेख केला. आता बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजपासोबत शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांना साथ देणारे शंभूराज देसाई व महेश शिंदे हे साताऱ्याचेच त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी समजणारे डॅशिंग व प्रशासनावर वचक ठेवणारे शंभूराज देसाई कॅबिनेमध्ये "ओके" असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा जिल्ह्यात सरकार स्थापन होणार असून मंत्रिमंडळ विस्तारात आता कोणाची वर्णी लागणार तसेच कोणाला कॅबिनेट तर कोणाला राज्यमंत्री याबाबत गल्लोगल्ली चर्चांनी उधाण येऊ लागले आहेत. शिंदे गटाकडून शंभर देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद फिक्स समजले जात असताना भाजपमध्ये मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले की जयकुमार गोरे याबाबत मोठी रस्सीखेच होणार असल्याचे बोलले जात आहे अशावेळी भाजप नेतृत्व दोन्ही आमदारांना मंत्रिपदे देऊन खुश करणार की कोणा एकाला माघार घ्यावी लागणार हे मात्र अंतिम क्षणापर्यंत सांगता येणे कठीण झाले आहे. जयकुमार गोरे यांच्या पाठीमागे सध्या ॲट्रॉसिटी फसवणूक या गुन्ह्यांचा पिच्छा असल्याने, कदाचित मंत्रीपद नाकारले जावू शकते. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सन्मान केला जाणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. परंतु आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची राष्ट्रवादी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेली जवळीकता कदाचित काही जणांच्या सांगण्यावरून मंत्रीपदातील आडकाठी ठरूही शकते. त्याचबरोबर पक्ष वाढीच्या दृष्टीने भाजप नेतृत्व दोन्ही आमदारांचा सन्मान करून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा कमी करण्याचा प्रयत्नही करतील असा, राजकीय अंदाज अनेकांकडून बांधला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त