कॅन्सर झाल्याच्या गैरसमजुतीतून बापानेच घोटला पोटच्या पोराचा गळा; हिवरेतील शाळकरी मुलाच्या खुनाचा उलगडा

कोरेगाव : कॅन्सर झाल्याची भीती मनात बसल्याने वडिलांनी दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना दि २९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हिवरे (ता कोरेगाव) येथे कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या अल्पवयीन मुलाचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केला होता. याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, यांच्या पथकाने वाठार पोलीस स्टेशनबरोबर समांतर तपास सुरू केला.

नकारात्मकेतून मुलाला संपवण्याचा विकृत विचार विजय खताळ यांच्या डोक्यात भिणू लागला. त्यानुसार त्याने शनिवारी घरापासून काही अंतरावर असलेल्या जनावरांच्या गोठ्यातून गायीच्या एका बाजूला बांधलेली दोरी सोडून खिशात घातली आणि गायीला साडीच्या धडप्याने बांधले.घरी येऊन बायको व मुलाला कुंभारकी नावाच्या शिवारातील शेतात जनावरांना चारा काढण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. ते तिघे शेतात गेले असता त्या शेतापासून पुढे काही अंतरावर विजय याची पत्नी जळण काढण्यासाठी गेली व विजय व त्याचा मुलगा विक्रम हे उसामध्ये जनावरांसाठी वाड्याचे कोंब काढण्यासाठी तोडणीस आलेल्या उसाच्या शेतामध्ये गेले. यावेळी विजय हा मुलाला सांगत होता, ‘आपण गरीब असल्याने आपल्याला लोक भरपूर त्रास देणार, तुला कोण काही बोलल्यास त्यांना न घाबरता..’ हे संभाषण चालू असताना विजयने खिशातून दोरी काढत विक्रमच्या गळ्यात टाकली व अशी दोरी टाकून ओढायची, असे म्हणत वडिलांनी विक्रमचा गळा आवळला.

सुमारे १० मिनिटांनी विक्रम निपचित पडल्यानंतर त्याला उसाच्या सरीत झोपवून त्याचा मृतदेह पाचटीने झाकला. त्यानंतर उसाचे कोंब काढून ते शेजारच्या शेतात टाकले व दुपारी चार वाजता गावच्या दिशेने जात असताना त्याच्या पत्नीचा अजून का घरी आला नाहीत? असे विचारण्यासाठी फोन आला. यावेळी विक्रमची चप्पल रानात विसरली आहे, तो चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात गेला आहे, असे सांगून तो स्वतः पुन्हा शेतात गेला व उसाच्या शेतात असलेली मृत विक्रमची चप्पल शेताच्या बांधावर टाकली व गावाजवळ असलेल्या गोठ्यात जाऊन गुन्ह्यात वापरलेली दोरी गायीला पुन्हा बांधून ठेवली.खुनाचे स्वरूप पाहून व दोन दिवसांच्या तपासामध्ये पोलिसांचा पहिल्यापासूनच मुलाच्या वडिलांवर संशय होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलिसांनी विकृतीतून घडलेल्या आणि बापानेच निष्पाप मुलाचा खून केल्याचा पर्दाफाश केला. आज संशयित आरोपीस कोरेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

असा केला बनाव
विक्रमचा खून करूनच बाप शेतातून घरी आला होता. मात्र, मी आणि प्रणव घरी येत होतो. वाटेत आल्यानंतर त्याची चप्पल विसरली. त्यामुळे तो परत गेला, असा त्याने बनाव केला होता. परंतु पोलिसांनी अत्यंत काैशल्याने त्याच्या तोंडून खुनाचा उलगडा केला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त