सुनेवर अत्याचार करणार्‍या सासर्‍यास पोलीस कोठडी

नागठाणे :  सातारा तालुक्यातील एका गावातील सुनेचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार करणार्‍या सासर्‍यास बोरगाव पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, विवाहितेच्या तक्रारीवरुन सासर्‍यासह तिचा पती, दीर, नणंदेवर देखील गुन्हा दाखल झाला असून या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार विवाहितेला तिच्या पती, सासरा, दीर व नणंदने चांगला स्वयंपाक येत नाही, घरातील कामे नीट करता येत नाहीत या कारणावरुन वेळोवेळी घालून पाडून बोलणे, उपाशी ठेवणे तसेच मारहाण करणे असे प्रकार केलेले आहेत. तसेच सासू व सासर्‍यांना माहेरहून 2 लाख रुपये घेण्यासाठी शारीरीक व मानसिक छळ केला. तर हे सर्व सुरु असताना दि. 12 डिसेंबर 2023 रोजी सासर्‍यांनी विवाहितेसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर दि. 16 डिसेंबर रोजी सासू व सासर्‍यांनी शिवीगाळ करत गंभीर स्वरुपाची मारहाण केली आहे. तर दीराने तुझा नवरा वेडा आहे, त्याचेकडुन तुझे भागत नसेल तर तु माझ्यासोबत झोप मी तुला मुलगा देतो असे म्हणुन माझ्याकडे शारीरीक संबंधाची मागणी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी पती, दीर, सासरा, सासू, नणंद यांच्यावर लेंगिक अत्याचार, विनयभग व मारहाणप्रकरणी गुन्ह दाखल केला आहे. दरम्यान, विवाहितेच्या सासर्‍यास अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर संशयितांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त