प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत सातारा तालुका पोलीसांनी ठोकल्या बेडया

सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकाची कामगिरी

सातारा :  सातारा येथील वर्ये तालुका सातारा, जिल्हा सातारा गावाच्या हद्दीत विठ्ठल मंगलम हॉटेलच्या शेजारी दि.11 डिसेंबर रोजी श्री.सुनील कुमार विश्वनाथ गर्जे वय वर्ष 35 राहणार कल्याण ठाणे या प्रवाशाला लुटून रोख रक्कम मोबाईल फोन चोरून नेल्याबाबत तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली होती.

     याबाबत माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी सूत्रे हलवली. अवघ्या बारा तासाच्या आत गोपनीय माहितीनुसार शाहीद शफिक शेख, वय 38 वर्षे ,राहणार रुपिनगर निगडी पुणे,विनायक गोवर्धन धाडगे, वय 37 वर्ष,राहणार धाडगे मळा नागरदेवळे अहमदनगर या दोन संशयितांना किणी, वाठार, कोल्हापूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने चौकशी केली असता. ताब्यात घेतलेला संशयित आरोपींनी चोरीची कबुली दिली. या आरोपीकडून रोख रक्कम व मोबाईल फोन ताब्यात घेऊन संशयित आरोपींना अटक केली असून. सदर गुन्ह्याचा अधिक तपास व्ही बी नेवसे सहा. पोलीस निरीक्षक करीत आहेत.

      

 सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो, सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे श्री व्ही.बी. नेवसे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अनिल मोरडे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री एस. एस. काटकर सहा. पोलीस निरीक्षक, पोहवा राजु शिखरे, पोहवा मालोजी चव्हाण, पोहवा दादा स्वामी, पोना प्रदिप मोहीते, पोना सतिश बाबर, पोकॉ शिवाजी डफळे, पोकॉ संदिप पांडव, पोकॉ धिरज पारडे, पोकॉ सचिन झनकर, पोकॉ रोहित बाबर व चालक सफौ माने यांनी केलेली आहे. सर्व अधिकारी व कर्माचारी यांचे श्री. समीर शेख, पालीस अधिक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी, सातारा यानी कौतुक व अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त