किल्ले अजिंक्यताराचा रस्ता लवकरच होणार चकाचक आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
Satara News Team
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
- बातमी शेयर करा
सातारा- ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. यामुळे पर्यटक आणि खास करून सकाळ, सायंकाळी वॉकिंगसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे किल्ले अजिंक्यताराच्या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून लवकरच हा रस्ता चकाचक होणार आहे आणि त्यामुळे सर्वांचीच गैरसोय दूर होणार आहे.
किल्ले अजिंक्यतारा महादरवाजा ते खाली पायथ्यापर्यंत रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. दररोज सकाळ आणि सायंकाळी किल्ल्यावर चालण्यासाठी, व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. तसेच दररोज किल्ल्यावर असंख्य पर्यटक ये- जा करत असतात. रस्ता खराब झाल्याने या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डीपीडीसीमधून २ कोटी ७५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. या निधीतून किल्ल्याच्या महादरवाजापासून पुढे ६०० मीटरपर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करण्यात येणार आहे. तसेच तिथून पुढील रस्त्याच्या कामासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या पर्यटन विभागाकडून ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून घेतला आहे.
या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा किल्ला ग्रुपच्या सदस्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोरे पाटील, धनंजय जांभळे, भालचंद्र निकम, विजय देसाई, आप्पा कोरे, कन्हैयालाल राजपुरोहित, धनंजय जाधव, दीपक देशमुख, दत्ता शिर्के, दादा भोसले, कमलाकर माळी, नितीन कारंडे, श्री. मोरे, गजानन चवरे, ओमकार खोले, अजय चव्हाण, प्रदीप शेळके, सागर जाधव, प्रताप पवार, फिरोज पठाण, पपू घोरपडे, रवी पवार, नीतीराज सूर्यवंशी, अमोल नलवडे, पोपट मोरे यांच्यासह किल्ला ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, किल्ले अजिंक्यतारावर दररोज असंख्य पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची ये- जा असते. यामध्ये सकाळी व सायंकाळी चालणे, फिरणे, व्यायाम करणे यासाठी लोक येत असतात. रस्ता खराब झाल्याने लोकांची गैरसोय होत होती, हि गैरसोय आता दूर होणार आहे. पावसामुळे भविष्यात रस्ता खराबच होऊ नये यासाठी महादरवाजा ते पुढे ६०० मीटर रस्ता काँक्रीट करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम लवकर सुरु करून हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सर्वांची गैरसोय दूर होईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. रस्त्याचे काम मार्गी लागल्याने किल्ला ग्रुपच्या सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सौ.काजलताई नांगरे पाटील मैदानात
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sun 23rd Apr 2023 06:18 pm











