माण पंचायत समितीच्या इमारतीला गळती,इमारत पडण्याच्या मार्गावर

कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका
Man Panchayat Samiti building leaking, building on the verge of collapse
माण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने सदरच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे,परंतु अद्याप तो शासन दरबारी तसाच पडून आहे,त्यामुळे हे काम रखडले आहे,प्रस्ताव मंजूर व्हावा अशी आमची ही इच्छा आहे सर्जेराव पाटील        गटविकास अधिकारी        माण पंचायत समिती

माण  : माण तालुका पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागली असून ती इमारत पडण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर सदर इमारतीची वैधता देखील संपून गेली असल्याने ती नादुरुस्त इमारत कधीही कोसळून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परंतु संबंधित अधिकारी आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या  कामचुकारपणामुळेच पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांसह तिथं असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.माण तालुका पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यशैलीवर आधीच नागरिकांचा आक्षेप असतानाच सदर इमारतीची झालेली दुर्दशा पाहता तिथे आपल्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तर सर्व काही दिसत आहे परंतु हे प्रशासनाच्या अजूनही का लक्षात आले नाही ? सदर इमारतीची दुरुस्ती अजूनही का झाली नाही? संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना हे दिसत नाही का? माण पंचायत समितीचा बांधकाम विभाग काय करत आहे, असे सवाल जनतेच्या माध्यमातून उमटताना दिसत आहेत.सदर गोष्टीची दखल घेऊन इमारतीच्या दुरुस्तीची तजवीज माण पंचायत समितीचे बांधकाम विभाग करणार की इमारत कोसळून एखाद्याला जखमी होण्याची किंवा जीव गमावण्याची वेळ येण्याची वाट पाहणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त