खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 24) साजरा होत आहे. यानिमित्त उदयनराजे मित्रसमूहाच्यावतीने उद्या, दि. 23 आणि सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 रविवारी (दि. 23) सकाळी 10 ते दुपारी 4 नुने येथे महाआरोग्य शिबिर, चिंचनेर वंदन मारुती मंदिरात नेत्र तपासणी शिबिर, शाहूपुरीतील मतकर कॉलनीत आरोग्य शिबिर, पोलीस मुख्यालय येथील गोशाळेत देशी गायींना चारा, गूळ आणि खुराक वाटप हे कार्यक्रम होणार आहेत. सातारा येथील गांधी मैदानावर दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत रिक्षा सौंदर्य स्पर्धा अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघाच्यावतीने होणार आहे. कोंडवे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सायंकाळी 7 वाजता राज्यस्तरीय खुल्या डान्स स्पर्धा होणार आहेत.

 वाढदिनी सोमवारी (दि. 24) खासदार उदयनराजे भोसले हे राजमाता कल्पनाराजे यांचे आशीर्वाद आणि जलमंदिरातील तुळजाभवानीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणार आहेत. शिखर शिंगणापूर, ता. माण येथे शंभू महादेवास सकाळी 7 वाजता महाभिषेक करणार आहेत. वळसे, ता. सातारा येथील एहसास गतिमंद मुलांच्या शाळेत सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत नेत्र तपासणी शिबिर, अपशिंगे मिलिटरी येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत रक्तदान शिबिर, सकाळी 10 ते दुपारी 2 चिंचणेर वंदन येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, सकाळी 10 वाजता आंबेवाडी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप, पाडळी जिल्हा परिषद शाळेत खाऊवाटप, सकाळी 11 वाजता सातारा येथील बुधवार नाक्यावर राणी लक्ष्मीबाई उद्यानाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता अन्नदान, सायंकाळी 5 वाजता वळसे येथील एहसास शाळेत गतिमंद मुलांना भोजन, सायंकाळी 6 वाजता सातारा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक सुशोभिकरणाचे भूमिपूजन होणार आहे. खा. उदयनराजे हे सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत जलमंदिर येथे शुभेच्छा स्वीकारणार आहेत. 

या कार्यक्रमांबरोबर उदयनराजे यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर यांनी केले आहे. 

खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त हार, बुकेऐवजी शैक्षणिक साहित्य कार्यालयात जमा करावे. हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त