अतुल जाधव यांना राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न पुरस्काराने सन्मानित!

दहिवडी  : दहिवडी अर्बन को.अॅाप.क्रेडीट सोसायटी दहिवडीचे चेअरमन अतुल गोविंदराव जाधव यांना राष्ट्रीय आदर्श संसदरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.चेअरमन म्हणून आपल्या सामाजिक,शैक्षणिक शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निस्वार्थी व भरीवपणे कार्य करुन शाश्वत सेवा केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती बेळगाव यांच्यावतीने सहकार क्षेत्रातील केलेल्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. 


सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना व महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींमध्ये आपली निवड झाली व आपल्या कार्याची दखल घेऊन या समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला.

यावर्षी सहकार चळवळीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चेअरमन अतुल जाधव यांना सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी माजी केंद्रीय कायदामंत्री व मुख्यमंत्री वीरप्पा मोइली,फाऊंडेशन चेअरमन व उद्योगपती सीमा इंग्रोळे,माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.अतुल जाधव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे आमदार जयकुमार गोरे याच्यासह विवीध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला