जावळी तालुक्यातील प्रति पंढरपूर करहर मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलानेच आज राजकीय दृष्ट्या दुरावलेले दोन्हीही जावळीचे आजी-माजी आमदार एकत्र आणले

In Pandharpur Karhar in Jawali taluka, on the occasion of Ashadi Ekadashi, Vitthal brought together both the politically estranged MLAs of Jawali.
लाखो भाविक विठ्ठल नामाच्या जयघोष करत करहर नगरीमध्ये येतात यातच सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या विरोधाच्या दोन बाजू शशिकांत शिंदे आणि शिवेंद्र राजे आज विठ्ठल पूजा साठी जावळीत एकत्र

पाचगणी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज जावळी तालुक्यातील प्रति पंढरपूर मध्ये वैष्णवांचा मेळा भरतो. लाखो भाविक विठ्ठल नामाच्या जयघोष करत करहर नगरीमध्ये येतात यातच सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या विरोधाच्या दोन बाजू शशिकांत शिंदे आणि शिवेंद्र राजे आज विठ्ठल पूजा साठी जावळीत एकत्र दिसले
दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपासून आमदार शशिकांत शिंदे शिवेंद्रसिंह राजे या दोन्हीही नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली। होती आणि दोन्हीही नेते राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या विचारांचे झाले. तेव्हापासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत व त्यानंतर जावळी तालुक्यातल्या सोसायटीच्या निवडणुकीपर्यंत दोन्हीही नेत्यांच्या कार्यकर्ते व गटामध्ये चांगलेच कलगीतुरे जिल्ह्याच्या राजकारणात दिसून आले .यातच दोन्हीही नेत्यांनी परस्परा विरोधात राजकीय आरोप प्रत्यारोप सह कलगीतुरे देखील सातारा जिल्ह्याच्या जनतेने पाहिले व ऐकले
 कधीतरी चुकून लग्नसोहळ्यात समोरासमोर येणारे शशिकांत शिंदे व शिवेंद्रराजे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने करहर तालुका जावळी येथील विठ्ठल मंदिरामध्ये एकत्रित पूजा करण्यास आल्याने अखेर या दोन्ही राजकीय नेत्यांना विठ्ठलानेच एकत्र आणले असे चित्र आज करहर मध्ये दिसून आले. राजकीय दृष्ट्या गेल्या दोन वर्षात या दोन्हीही नेत्यांच्या गटात चांगलाच संघर्ष पहावयास मिळाला
 दोन्हीही नेत्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय डावपेच टाकण्यात कुठलाही कसूर केला नाहीयात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्र राजे यांचं पारडं जड ठरलं विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा खापर शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्र राजे यांच्यावर भलेही फोडले असले तरीतेव्हापासून आजपर्यंत जावळी तालुक्यात जेव्हा जेव्हा शशिकांत शिंदे यांचा राजकीय हस्तक्षेप झाला तेव्हा शिवेंद्र राजे व  शशिकांत शिंदे यांच्या गटा विरोधात व प्रत्यक्ष  आ शिंदे यांच्यावर राजकीय परखड भूमिका बोलण्यास आमदार शिवेंद्र राजे कुठेही कमी पडले नाही व त्याला प्रतिउत्तर देण्यास शशिकांत शिंदे ही मागे पडले नाहीत
 प्रासंगिक कार्यक्रमात दोन्ही नेत्यांचा आमना सामना होतो तेव्हा नमस्कार चमत्कार होतच असतो
 या सर्व घटनांना पाहण्यासाठी दोन्हीही कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह व कुतहूल असतं आमदार शिंदे व आमदार भोसले एकमेकांसमोर आल्यानंतर कसे बोलतात, कसे वागतात ,त्यांची राजकीय बॉडी लँग्वेज कशी आहे ,या छोट्या-मोठ्या गोष्टीकडे देखील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची लक्ष असते व त्यावर राजकीय चर्चा चांगलीच दूरपर्यंत रंगतेआता व्यासपीठावर एकमेकांच्या विरोधात बोलणारी दोन्हीही नेते आज जावळी तालुक्यातल्या विठ्ठल मंदिरात एकत्रित पूजा करताना दिसल्यानंतर व एकमेकांना नमस्कार व आषाढीच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी पाहिल्यावर कार्यकर्ते मनोमनी म्हणत असतील  बाबाराजे भी ओके,व शिंदे साहेब भी ओकेच
 दोन्ही ओकेच असो राजकीय दृष्ट्या भलेही आरोप प्रत्यारोप होत असले तरी दोन्हीही नेत्यांची आजच्या भेटीची देहबोली एकच दिसून आली

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त