वडूजच्या नगराध्यक्षपदाचा आज होणार फैसला;जाधव,गोडसेंची नावेही चर्चेत

वडूज : नव्याने स्थापन झालेल्या खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीमध्ये भाजप बहुमतात आहे. त्यामुळे यंदा नगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेवक सोमनाथ जाधव व  महिला नगरसेविका सौ स्वप्नाली गोडसे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. 
     खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरपंचायतीचे अडीच वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या काही नगरसेवकांनी  भाजपमध्ये प्रवेश केला.                 अडीच वर्षांपूर्वी महिलेसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदी सौ मनीषा काळे यांची वर्णी लागली. त्यानंतर राजकीय अनेक डावपेच आखण्यात आले. परंतु, भाजपने राष्ट्रवादीवर  डावपेच उलटून लावले. आता सध्या भाजप पूर्णपणे बहुमत असून आरक्षण लागले तर सोमनाथ जाधव व  सौ स्वप्नाली गोडसे यांचे नगराध्यक्षपदी नाव पुढे आलेले आहे.अनुसूचित अनुसूचित जातीसाठी जर आरक्षित झाली तर भाजपकडे ओमकार चव्हाण हे एकमेव नगरसेवक आहेत.
          सध्या भाजप पूर्ण सत्तेमध्ये असून केंद्र व राज्यात तसेच माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे आहेत. त्यामुळे विकास कामांमध्ये चालना मिळेल. अशी माहिती ज्येष्ठ भाजप नेत्यांनी दिली आहे. मंगळवार दि. ३० जुलै रोजी वडूज नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची सोडत होणार आहे. याकडे संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त