स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी फलटणचा आमदार स्वतंत्र नाही....बुवासाहेब हुंबरे

फलटण, :  देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी फलटण मतदार संघाचा आमदार स्वतंत्र नाही . फलटणचा मतदार संघाचा आमदार स्वतंत्र करणार असून नेतृत्व नाही तर प्रतिनिधी म्हणून मी फलटणकर हा स्वाभिमान निर्माण करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (खा. शरदचंद्र पवार) गटाचे इच्छुक उमेदवार बुवासाहेब हुंबरे यांनी सांगितले.

पञकार परिषदेत पुढे बोलताना हुंबरे म्हणाले, स्वातंत्र्य मिळवून तब्बल पंचाहत्तर वर्षे झाली मात्र फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदारांना स्वातंत्र्य नाही.


फलटण तालुक्याचा विकास नाही, कमिन्स आली मात्र इतर कंपन्या आल्या नाहीत, नाईकबोमवाडी एमआयडीसीच पुढं काय झाले? असे एक ना अनेक प्रश्न सुटत नसल्याने मी यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. फलटणच्या विकासाला चालना देण्यासाठी आयटी सेक्टर फलटणमध्ये आणणार आहे.

श्री. हुंबरे म्हणाले, मतदारसंघात अजिबात विकास झाला नसून या आमदारांना अजिबात स्वातंत्र्य नाही, विकासाची दूरदृष्टी नाही, शेतकऱ्यांचे बचत गट नाहीत, युवकांना रोजगार नाही खा. शरद पवारांच्या माध्यमातून कमिन्स सारखा प्रोजेक्ट उभा राहिला परंतु पुढे इतर कंपन्या आल्या नाहीत हे सत्ताधारी लोकांचे अपयश आहे.


महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली किमान एका गावात दहा तरी महिलांचे बचत गट स्थापन करणार असून युवक बेरोजगार राहणार नाहीत. ते बारामती, पुणे, मुंबईत न जाता त्यांना फलटण तालुक्यात संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त