गुरुवार परज परिसरासह साताऱ्यात पोलिसांची गुटखा गोडावूनवर धाड

सातारा : सातारा शहरातील गुरुवार परज येथे मंगळवारी सांयकाळी पोलिसांनी गुटखा साठवलेल्‍या अड्ड्यावर धाड टाकली. प्राथमिक तपासात लाखो रुपयांचा गोडावून भर गुटखा सापडला असून रात्री उशीरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु होती.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, शहरात गुटखा चोरी-छुप्‍या पध्दतीने विक्री होत आहे. बिनधोकपणे त्‍याची वाहतुक होत असून स्‍थानिक पोलिस थातूर मातूर कारवाई करण्यात धन्‍यता मानत आहेत. मंगळवारी मात्र प्रोबेशनरी डीवायएसपीच्या पथकाला गुटखा साठ्याबाबत टीप मिळाली. त्‍यानुसार पोलिस एक पथक तयार करुन त्‍यांनी छापा टाकला. गुरुवार परज परिसरात पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात आल्‍याने बघ्यांची गर्दी वाढली. पोलिसांना याठिकाणी लाखो रुपयांचा गोडावूनभर गुटखा सापडल्‍याचे समोर आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त