पुसेगाव येथे रस्त्याच्या कामासाठी कडकडीत बंद

पुसेगाव : सातारा-लातुर राष्ट्रीय महामार्गाचे पुसेगाव गावठाण हद्दीतील बंद पडलेले काम तत्काळ चालू करणेच्या मागणीसाठी पुसेगाव येथे बंद आणि रस्ता रोको आंदोलनाची हाक पुसेगाव ग्रामस्थांनी दिली होती त्याला उत्फुर्थपणे प्रतिसाद मिळाला पुसेगाव आज कडकडीत बंद पाळण्यात आला. 

 गेली 30/40 वर्षे झाली पुसेगाव गावठाणातील अरुंद रस्तेमुळे वाहतूक कोडी होवून लहान मोठे अपघात घडले आहेत तर रोड लगत गटर बांधकामासाठी खोली जागाच उपलब्ध नसलेले मुख्य रस्तेनेच सर्व गावठाणातील नागरिक वस्तीचे सांडपाणी वाहत असते तसेच विद्युत पुरवठा करणारी डांब,पाणी पुरवठा पाईपलाईन, टेलिफोन केबल, पथदिवे, इ नागरी सुविधा उपलब्ध करणेसाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे ग्रामस्थांचे मध्ये तीव्र संताप अआहे तसेच पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा भरत असते यासाठी अंदाजे 10/15लाख भाविक भक्त पुसेगाव मध्ये दाखल होत असतात त्यासाठी वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत तोकडा पडत असुन त्याचे रूंदीकरण व्हावे असी ग्रामस्थांची मागणी आहे तरी या बाबत पुसेगाव येथील काही ग्रामस्थ या बंद पडलेल्या काम चालू करणेच्या मागणी साठी धरणे आंदोलन करत आहेत याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुसेगाव बाजारपेठ आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले याबाबत संबंध महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ ,मेगा कंपनी काँन्टँक्टरं, आणि भुमिअभिलेक कार्यालयात वडुज ता खटाव यांनी आंदोलनकर्तेना लेखी आश्वासन दिले आहे की लवकरात गावठाण हद्दीतील सिटी सव्ह्रे रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करुन खाजगी जागा शासकीय जागा याचे सविस्तर अहवाल संबंधित विभागाला देवु आणि जागा उपलब्ध झाले नंतर अर्धवट राहिलेले काम पुर्ण करून देणेचे मेगा इंजिनिअरिंग कंपनीने लेखी आश्वासन दिले त्या प्रमाणे नंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेणेत आले आहे परंतु धरणे आंदोलन प्रत्यक्ष काम रस्त्याचे चालू होई पर्यंत तसेच पुढे चालू ठेवणेचे आंदोलकांनी जाहीर केले. 

 या प्रसंगी काही मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुनील शेठ जाधव, प्रदिपराव जाधव, अँड.रोहित कांबळे, सुरज जाधव, राम जाधव, धिरज जाधव, विजय पवार, बाळासाहेब जाधव, सुसेन जाधव, विशाल जाधव, सचिन देशमुख, संतोष तारळकर, सुरज जाधव, राम फडतरे, वगैरे ग्रामस्थ उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त