पुसेसावळी संपूर्ण शहर सीसीटीव्ही कक्षेत, प्रक्षेपण थेट पोलिस अधिक्षकांकडे असून फायदा काय?

पुसेसावळी : पुसेसावळी संपूर्ण शहर आणि शहरातील रस्त्यांसह सर्व कानाकोपरे आता सिसीटीव्ही च्या कक्षेत आले असल्याने पुसेसावळी सह परिसरात आता एखादा गुन्हा घडलाच तर संबंधित गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळणे म्हणजे " घनटों का काम मिनटोमें " होणार असून अवैध व्यवसायीकांवर पोलिस प्रशासनाकडून यापुढे करडी नजर राहणार असल्यामुळे अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत.

 पुसेसावळी येथे अवैध गौण खनिज व्यवसायाला सोन्याचा भाव आला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक यापैकी उत्खनन हा विषय महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असतो परंतू येथे ग्राममहसूल अधिकारी अथवा मंडलाधिकारी कार्यालय असूनही कोणताही महसूल अधिकारी पुसेसावळी येथे मात्र कागदोपत्री वास्तव्यास असून वास्तविक वास्तव्यास नसल्याने गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे "रात्रीस खेळ चाले" प्रमाणे मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे दिसून येते. तर गौण खनिज वाहतूक हे पोलिस प्रशासनाच्या अखत्यारीत असलेला विषय असूनही महसूलचे अधिकाऱ्यांची अनुपस्थिती पोलिस प्रशासनाला हतबल करणारी ठरत आहे. यामुळेच कारवाई शुन्य असल्याचे समोर येत होते. परंतू आता संबंधित अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर सिसीटिव्ही द्वारे २४ तास नजर ठेवली जाणार असल्याने अवैध गौण खनिज व्यवसायाला चाप बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 जिल्हा पोलिस प्रशासनातील अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत एखादे चांगले कौतुकास्पद कामगिरी केली तर त्याचे श्रेय आपोआपच जसे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून कार्यरत जिल्हा पोलिस अधिक्षक यांंना जाते त्याचप्रमाणे जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय रोखण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारीही जिल्हा पोलिस अधीक्षक या नात्याने मोठ्या मनाने स्विकारण्याची मानसिकता असणे ही देखील कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी ती तयार करणे आवश्यकच आहे.

 संपूर्ण पुसेसावळी शहरात सुमारे ३७ सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे थेट प्रक्षेपण पुसेसावळी दुरक्षेत्रात होत असले तरी त्याचे लाईव्ह प्रक्षेपण जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचेकडेही होत असल्याची माहिती मिळाली आहे. परंतू शहर आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी पाहता संबंधितांकडून सिसीटीव्ही चा वापर नेमका कशासाठी करण्यात येत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


जिल्हा पोलिस अधीक्षक अवैध व्यवसाय रोखण्यात सपशेल अपयशी ठरले?  पुसेसावळी सह परिसरात अवैध गुटखा, मटका, गांजा यावर विद्यमान जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अप्पर पोलीस अधीक्षक असताना ज्या पद्धतीने "जरब" बसवली होती ती कायम ठेवण्यात विद्यमान पोलिस अधीक्षक सपशेल अपयशी ठरल्यानेच पुसेसावळीच्या जुन्या बसस्थानक परिसरात आता सोरट, चक्री सारखे नव्याने सुरू झालेले अवैध व्यवसाय हे अवैध व्यवसायीकांची बेरोजगारी दूर करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष म्हणजे एकप्रकारे अवैध व्यवसायीक आणि संबंधित विभागाचे "एकमेकांस सहाय्य करू" हे धोरण राबवल्या सारखे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त