महाबळेश्वरात पिल्लासह आलेली रानगव्याची मादी परतली जंगलात

सातारा :  महाबळेश्वर देवस्थानच्या वाहनतळ चौकात रानगवा मादी व पिल्लू बुधवारी दि. ६ रोजी रात्री आढळून आले. त्यांच्या वावरण्यात गावकऱ्यांनी कोणताही अडथळा न आणल्यामुळे ही रानगव्याची मादी पिलासह जंगलात निघून गेली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चारी बाजूनं जंगलांनी वेढलेला क्षेत्र महाबळेश्वरचा परिसर आहे. या परिसरात वन्य जीवांबरोबर फार पूर्वीपासून खेळीमेळीच्या वातावरणात राहणे क्षेत्र महाबळेश्वरकरांना नवीन नाही.

दरम्यान, बुधवारी संध्याकाळच्या वेळी वाट चुकलेली रानगव्याची मादी तिचे पिल्लासह क्षेत्र महाबळेश्वर मंदिराशेजारी असणाऱ्या वाहनतळ चौकात आढळून आली. गावकऱ्यांनी कोणताही गोंधळ न करता या मादी व पिलास वाट मोकळी करून दिल्यावर ती रानगाशव्याची मादी तिच्या पिलासहित सुखरूप नजीकच्या जंगलामध्ये निघून गेली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त