पत्रकाराच्या हत्येप्रकरणी साताऱ्यात उद्या निदर्शने...अध्यक्ष हरिष पाटणे
सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार निदर्शनेSatara News Team
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
- बातमी शेयर करा
सातारा - राजापूर जि.रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्येप्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 10 रोजी 12 वाजता निदर्शने केली जाणार आहेत. दरम्यान, तालुका पातळीवर पत्रकार संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ही निदर्शने केली जाणार आहेत.
राज्य पातळीवर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने झालेल्या बैठकीत आंदोलनाची भूमिका ठरवण्यात आली. या आंदोलनात राज्यातील सर्व पत्रकार तसेच संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, परिषदेचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव दीपक प्रभावळकर, प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सुजित आंबेकर ,डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे व सर्व पदाधिकार्यांनी केले आहे
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारया पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच दोन दिवसांपूर्वी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी निदर्शने केली जाणार आहेत.
स्थानिक बातम्या
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
संबंधित बातम्या
-
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
-
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
-
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Thu 9th Feb 2023 04:58 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 9th Feb 2023 04:58 pm











