शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, करंजे पेठ, सातारा चा इयत्ता दहावीचा सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकाल

सातारा : शिक्षण प्रसारक संस्था संचलित  न्यू इंग्लिश मिडीयम  स्कूल, करंजे पेठ,सातारा  या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल या वर्षी ही सलग पाचव्यांदा  100% लागला असून विद्यालयाने शंभर टक्के निकालाची  पंरपरा जोपासली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहित करणारी शिक्षण प्रसारक संस्था खऱ्या अर्थाने कला व गुणांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरते हे या निकालांती दिसून आले असून इथे असणारे विद्यार्थी मेहनती व शिक्षणाची आस असणारे आहेत.तसेच शिक्षक व इतर स्टाफ सुध्दा विद्यार्थी घडविण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करतं आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य  व संस्थेचे सचिव मा. श्री तुषार पाटील सर व संचालिका मा. सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम यांच्या अचूक नियोजन व मार्गदर्शनामुळेच 100% निकालाची परंपरा राखली गेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे मा. अध्यक्ष मा. श्री  सदाशिव कुंभार , उपाध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ किर्दत व मा.श्री. नंदकिशोर जगताप,सचिव मा. श्री. तुषार पाटील ,स्कूल कमिटी चेअर पर्सन मा.सौ.वत्सला डुबल, संचालिका मा.सौ.प्रतिभा चव्हाण, मा.सौ. हेमकांची यादव  व सर्व संचालक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निलम शिंदे, पर्यवेक्षिका कु. दिपाली कदम, पी. आर. ओ. सौ मंजुषा किरकिरे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,करंजे ग्रामस्थ  व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पहिल्या पाच मध्ये आलेले  विद्यार्थी खालील प्रमाणे:
1.कु.चव्हाण सुचिता सचिन 94.40%
2.चि.मेणकर ओम विजय 91.20%
3.चि. शिंदे दीपेश विशाल 89.20 %
4.कु. इंगवले तनिष्का सुनील 87%
5.चि. यादव शिवराज संजय कुमार  86 %
 सर्वच विदयार्थ्यांनी भरघोस यश मिळवले आहे.या सर्वांचे संस्थेचे सचिव मा. श्री तुषार पाटील सर व संचालिका मा. सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम यांनी  मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला