शिरवळ येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत ५ जणांची टोळी जेरबंद
एकुण ३ लाख ५१ हजार ५०० रु चा मुद्देमाल जप्तSatara News Team
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मौजे शिरवळ ता खंडाळा गावचे हद्दीत अॅटोमोबाईल दुकानावर दरोडा टाकण्यासाठी तयारीत असलेल्या परजिल्हयातील ५ जणांच्या सराईत टोळीस शिरवळ पोलीसांनी रात्रगस्त दरम्यान ताब्यात घेतले आहे. दिनांक २७/६/२०२४ रोजी पहाटे ०३:३० वा चे दरम्यान शिरवळ येथील राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या रामेश्वर ॲटोमोबाईल व गॅरेज येथे एक संशयीत स्वीफ्ट कार व संशयीत इसम निदर्शनास आले. रात्रगस्त पेट्रोलींग करीता असलेले शिरवळ पोलीसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शननास असल्याने त्यांना ताब्यात घेणेत आले व त्यांची झडती घेऊन विचारपुस केली असता त्यांचे कडे लोखंडी कटर, लोखंडी कटावणी, मीरची पुड मोबाईल असे संशयास्पद वस्तु मिळुन आल्या.त्याचेकडे अधिक सखोल विचारपुस केली असता ते पाच हि जण लगतच असले रामेश्वर ॲटो गॅरेज या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इसमांकडे त्यांचे ताब्यातील स्वीफ्ट कार व दरोडयासाठी लागणारे साहीत्य असा एकुण ३ लाख ५१ हजार ५०० रु चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल सो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस साो, यांनी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनुचित प्रकार व गंभीर घटना रोखण्याकरिता शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदिप जगताप यांना गस्त वाढविण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार नितीन नलावडे, विजय शिंदे होमगार्ड जालींधर येळे व रामदास ननावरे हे शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत असताना शिरवळ गावच्या हद्दीत महामार्गालगत असणा-या रामेश्वर ॲटो गॅरेज जवळ काही इसम वाहनासह संशयीतरित्या दबा धरुन बसल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीस अंमलदार नितीन नलावडे यांनी पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांना याबाबतची माहिती देऊन मदतीसाठी पोलीस स्टाफ बोलावुन घेतला. त्यानंतर पोलीस अंमलदार गिरीश भोईटे, सुरज चव्हाण संग्राम भोईटे असे मिळाले माहितीच्या ठिकाणी आलेनंतर शिरवळ पोलीसांनी सदर इसमांना कोणताही माग लागुन न देता अचानकपणे छापा टाकुन व पळुन जाणारे दोन जणांना पाठलाग करुन पकडुन ताब्यात घेतले. यावेळी संशयीतांना याबाबत विचारपुस केली असता त्यांचा लगतच असलेल्या रामेश्वर ॲटो गॅरेज या ठिकाणी दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे विचारपुसअंती निष्पन्न झाले व त्यांच्या कडे दरोडयासाठी व शटर कापण्यासाठी लोखंडी कटर असलेली मोठी पक्कड, शटर उचकटयाची लोखंडी कटावणी तसेच प्रतिकारासाठी मिरची पुड व स्वीफ्ट कार असा एकुण ३ लाख ५१ हजार ५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
सदर कारवाईमध्ये सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख साो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल सो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस साो, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सहा फौजदार धरमर्सीग पावरा, पोलीस अंमलदार नितीन नलावडे, गिरीश भोईटे विजय शिंदे, अजित बोराटे, संग्राम भोईटे, सुरज चव्हाण व होमगार्ड जालींधर येळे व रामदास ननावरे यांनी सहभाग घेतला आहे. सदरच्या उल्लेखनिय कामगीरीबाबत सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक, श्री राहुल धस साो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
#shirval
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Thu 27th Jun 2024 04:52 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Thu 27th Jun 2024 04:52 pm













