किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर मौजे गाढवेवाडी येथे संपन्न

विद्यार्थ्याचे मन आणि मनगट भक्कम होण्यासाठी श्रमसंस्कार शिबीर महत्वाची भूमिका बजावते – श्री. नारायण घोलप

गाढवेवाडी :  ‘विद्यार्थ्याचे मन आणि मनगट भक्कम होण्यासाठी श्रमसंस्कार शिबीर महत्वाची भूमिका बजावते. युवा पिढीला ग्रामीण जीवनाचा जवळून परिचय शिबीरातून होतो. श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हेच या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे’. असे उदगार वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. नारायण घोलप यांनी गाढवेवाडी येथे काढले.
मौजे गाढवेवाडी ता. वाई येथे किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जनता शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. सुरेश यादव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. राजेंद्र शिंदे, पर्यवेक्षक श्री. विवेक सुपेकर, गाढवेवाडी गावचे सरपंच श्री. सुनील मांढरे, उपसरपंच सौ. संगिता गाढवे, पोलिस पाटील सौ. निताली पाटणे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
    श्री. नारायण घोलप मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, ‘मोबाईलच्या अति वापरामुळे घराघरातील सुसंवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे समाजसेवा, आरोग्य संवर्धन, देशप्रेम, ध्येयनिश्चिती, उत्तम चारित्र्याचे जतन इत्यादी नैतिक मूल्ये जोपासण्याचे संस्कार कुटुंब आणि समाजातून लाभत नाहीत. त्यामुळे आत्मकेंद्री बनलेले युवक चंगळवादाकडे धावत आहेत. अशावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीर हे दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे. स्वयंसेवकांनी हा श्रमाच्या प्रतिष्ठेचा वारसा सर्व समाजापर्यंत पोहचविला पाहिजे.
    अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री. सुरेश यादव म्हणाले की, ‘शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवलेले हे सात दिवस हा त्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ आहे. शिबीरातील आठवणी आयुष्यभर काळजावर कोरल्याप्रमाणे लक्षात राहतात. त्यांना सामाजिक समरसतेची जाणीव होते. ग्रामीण संस्कृतीचा संपूर्ण परिचय या शिबीरामधून होत असतो. या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून हे तरूण नक्कीच भावी जीवनात उत्तम समाज कार्य करतील असा विश्वास वाटतो.
    या प्रसंगी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, सरपंच श्री. सुनील मांढरे, यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. तसेच ग्रामस्थांच्या वतीने सौ. मनिषा चिकणे श्री. अशोकराव गाढवे, श्री. मिलिंद गाढवे यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने कु. आदिती भोसले व तेजस शेलार यांनी मनोगते व्यक्त केली. 
ग्रामस्थांच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच कार्यक्रम अधिकारी, शिबीर सहायक‍ शिक्षक, आदर्श विद्यार्थी, आदर्श स्वयंसेवक पुरस्कार हर्षद ओंबळे व श्रृती पवार या विद्यार्थ्यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ विकास पाटणे, प्रभाकर जाधव, पांडुरंग भिलारे, दत्तात्रय पाटणे, रविंद्र भिलारे, भरत चिकणे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्प अधिकारी श्रावण पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बाळासाहेब कोकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गौरी पोरे व नयना भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तर गणेश चव्हाण यांनी आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त