सातारा जिल्ह्याच्या विभाजनाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही : जिल्हाधिकारी संतोष पाटील

अफवेखोरांचा बंदोबस्त करणार; 'रयतराज'च्या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

सातारा : सातारा जिल्ह्याच्या विभाजनाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही. त्याअनुषंगाने कसलीही माहिती राज्य शासनाने मागवलेली नाही. जिल्हा विभाजनाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीवर जिल्हावासीयांनी विश्वास ठेवू नये. विभाजनाच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही, असा निर्वाळा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सातारा जिल्ह्याच्या विभाजनाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही : जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन स्वतंत्र ‘माणदेश’ या नावाने नवा जिल्हा होणार असून त्या जिल्ह्याचे नकाशे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. त्याबाबत रयतराज संघटनेचे संदीप भाऊ शिंदे यांनी निवेदन दिले होते. यापार्श्वभूमीवर लक्ष वेधले असता जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, जिल्हा विभाजनाचा यापूर्वी कसलाही प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात आलेला नाही. तसेच या अनुषंगाने शासनाने सध्या कोणतीही माहिती मागवलेली नाही. राज्यात 21 जिल्हे नव्याने तयार होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, त्यामध्ये सध्या तरी तथ्य नाही. कंटेंट तयार करण्यासाठीचे तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी काय लागते? रिल्स बनवणारे सर्वच फार सुशिक्षित आहेत का? चांगली माहिती पसरण्यासाठी वेळ लागतो. मात्र गैरसमज पसरवणार्‍या कंटेंटवर लगेच चर्चा होते. सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारित करणार्‍यांविरोधात भविष्यात कडक धोरण अवलंबले जाईल. सातारा जिल्हा विभाजनाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

अफवेखोरांचा बंदोबस्त करणार; रयतराजच्या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल        रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीपभाऊ शिंदे यांनी काल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देत जिल्ह्याचे विद्रुपीकरण कार्यांचा प्रयत्न काही नेटकरी करत असून ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत निवेदन दिले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलताना म्हटले कि, सोशल मीडियावर अलिकडे अफवेखोरांची संख्या वाढली आहे. काम, धाम नसणारी टोळकी अफवांच्या माध्यमातून विद्वेष पसरवत आहेत. त्यामुळे काम असणारेही डिस्टर्ब होवून जातात. अशा अफवेखोरांमुळे अनेक ठिकाणी गैरप्रकार होत आहेत. जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा करुन सोशल मीडियावरील अशा अफवेखोरांसंदर्भात तक्रारी आल्यास सायबर सेलच्या माध्यमातून त्यांचा बंदोबस्त करु असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त