हेडाम'च्या माध्यमातून मेंढपाळांच्या व्यथा उलगडणार

नागू वीरकर लिखित हेडाम कादंबरीचे उदघाटन संपन्न

दहिवडी : माणदेशी  फिरत्या मेंढपाळाचया जगण्याचया व्यथा, संघर्ष, विशद करणारी  हेडाम ह्या नागु विरकर(केंद्र प्रमुख ठाणे )लिखीत कादंबरीचा प्रकाशन सोहळा कल्याण येथील आचार्य  अत्रे नाट्यगृह येथे संपन्न झाला.
        कादंबरी प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित माण देशी सुपुत्र डॉ.नितीन वाघमोडे आयुक्त आयकर विभाग मुंबई, डॉ.जगन्नाथ विरकर अप्पर जिल्हाधिकारी मुबई, डॉ.महेश खरात प्रसिध्द लेखक समिक्षक,औरंगाबाद,,युवा साहित्य आकादमी पुरस्कार प्राप्त फेसाटी कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे. प्रा.सचिन रूपनवर,जगन्नाथ विरकर साहेब निवृत्त केन्द्र प्रमुख ,शंकर विरकर साहेब म्हाडा मॅनेजर, शंकर विरकर, स्टार ट्रॅव्हल्स चे मालक,लेखकाचे वडील, पत्नी सुरवंताविरकर, धुळदेव गावचे सरपंच राणी दुर्योधन कोळेकर, युवराज कोळेकर, पंजाब कोळेकर, प्रकाश सोहळा समिती उपस्थित होती 
         प्रस्ताविकात लेखक नागु विरकर यांनी हेडाम ह्या कादंबरीची निर्मीती कशी झाली सांगत असताना..माझ चौथीपर्यंत बालपण व सुशिक्षित बेरोजगार असतानाही गावोगाव फिरणाऱ्या मेंढपाळाचया तांडया समवेत गेले होते.जालिंदर गुरूजीनी त्याना घोड्यावरून उतरून घेऊन स्थलांतर थांबवलं व शिक्षणाची वाट दाखवली. उच्च शिक्षण घेऊन जीवन परिवर्तन झाल. समाज्यातील संघर्ष, व्यथा, वेदना, लढाऊ वृत्ती,हाल आपेषटा चिवटपणा, प्रस्तावित समाजया पेक्षा वेगळ् जगन,त्याच्या मुलाच्या शिक्षणाची फरपट,माण देशी दुष्काळग्रस्त शेतकरी कुचंबना आजही होत आहे.ना घर ना दार,रोज नव गाव नवी चूल करत फिरणारा समाज ह्या संवेदना अस्वस्थ करत होत्या. त्या मांडव्यात असे सतत वाटत होते..त्या लिहीत गेलो आणि हेडाम कादंबरीची निर्मीती झाली. असे भावूक मत नागू वीरकर यांनी व्यक्त केले. 
       ही कादंबरी वाचकांनी वाचकाना वेगळी दिशा देईल..आपण वाचून प्रतिक्रीया द्याव्यात असे आव्हान केले.
            नितीन वाघमोडे  शुभेच्छा देत असताना मला कादंबरीच मुखपृष्ठचं पाहूनच कार्यक्रम उपस्थित रहाण्याची भावना मनात उभी राहिली.कादंबरीचा बराचसा सार मुखपृष्ठ बोलते आहे आमच्या सारख्या उच्च पदसथ धडपडीतून शिक्षक घेऊन शहरात स्थिरावलेल्या प्रत्येक वर्गास कादंबरी अंतर्मुख करते.समाजयाचा व्यथा वेदना च्या मुळाशी जाऊन लेखकानी अससलं माणदेशी भाषेत लेखन केले आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
              डॉ.जगन्नाथ विरकर साहेब यांनी हा माझा कैटूबीक कार्यक्रम आहे कादंबरीतील अनेक पात्र माझे नातेवाईक आहेत. कादंबरीतील नाग्याचं जगण हे त्याच एकट्याच नसून माझाच  जीवन पट त्यानी मांडला आहे असं वाटतं. माण देश हा दुष्काळी आहे..मेंढपाळ आणि शेती इथल्या उदरनिर्वाहचे साधन असले तरी प्रचंड संघर्ष ,माणदेशी मुलांना शिक्षण घेत आसताना प्रचंड कस्ता खाव्या लागतात. आमच्या सारखे अनेक अधिकारी माणचया मातीतून घडले पण सहज नाही..  वाचताना पुस्तक हातातून सुटत नाही माझया बीझी शेडूल मधून मी सलग आठ तासात सी कादंबरी वाचून संपवली आहे अनेकवेळा माझे डोळे ओले झाले.माणदेशी माणसं प्रचंड बुध्दीवादी व कष्टाळू आहेत.  किती संघर्ष करावा लागतो हे आजच्या नवतरुण पिढीला ही कादंबरी वाचून दिशा दर्शक ठरेल. धनगर समाजाची संस्कृती, खिलारयाचं व्यवस्थापन, ग्रामीण अस्सल लोप पावत चाललेले शब्द लेखकानी जसेच्या तसे मांडले आहेत. धनगर समाजयाचं गजीनृत्य, हेडाम, चालीरीती, परंपरा, धार्मिक वारसा जतनं करणारी कादंबरी आहे. सर्वानी कादबरी खरेदी करून वाचावी लेखकाला बुक द्यावे. असे सांगतं स्वता 111 प्रती आजच  विकतं घेऊन वरीष्ठ अधिकार्यांना वाचण्यास देत आहे असे स्पष्ट केले.
            प्रसिध्द लेखक समिक्षक डॉ.महेश खरात यांनी कादंबरीच प्रकाशन झालं अस सागून कादंबरीच भाषा विज्ञानाच्या अंगाने  समिक्षण केले.हेडाम हा शब्द मराठी भाषाकोषात नव्याने समाविष्ट होत आहे...लेखकानी तटस्थ राहून नाग्या ह्या पात्राला धनगर नव्हे तर बहुजन समाजयातील एका धडपड करत शिकणाऱ्या नायकाचा न्याय दिला  आहे.ही कादंबरी धनगर आरक्षण समितीने संदर्भ ग्रंथ म्हणून वापरायला हवी .लेखकानी १९८० ते २०००  च्या काळातील मायदेशातील शिक्षण घेत आलेल्या तरुणाची वास्तव विदारक वर्णन मनाला अंतर्मुख करते.सामाजीक अंतमभान ठेवून कसदार लेखक उदयास येत आहे ही अभिमानाने सांगतो. कौटुंबिक,सामाजिक काही प्रसंग जिल्हाधिकारी म्हटले तसं डोक्यात पाणीच काय हमसुन रडायला लावतात. प्रत्येकानी धनगर, माणदेशी ठेवा आसणार ग्रंथ म्हणून शाळा कॉलेज,व स्वता:च्या ग्रंथालयात खरेदी करून ठेवा असे आवाहन करून पुढे लिहीत राहा,आमची मदत घ्या. तुमच्या लेखनावर कोणत्याही लेखकाचा प्रभाव नाही. तुमचं लेखन माण देशात वेगळी ओळख करेन देईल एवढ निश्चीत. अस बोलून शुभेच्छा दिल्या 
       जगन्नाथ विरकर निवृत्त केन्द्र प्रमुख व शिक्षक नेते यांनी कादंबरीची जडणघडणीचा मी साक्षीदार असून नावा पासून ते प्रकाशन सोहळ्या पर्यंतचा प्रवास  विशद केला. तम्मा महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक, प्रोफेसर यांनी ही कादंबरी वाचावी एक शिक्षक काय करू शकतो...हे सांगताना. गोंदवले गावचे शिक्षक व लेखकाच्या आयुष्याचे वाटाडे जालिंदर खाशाबा पोळ याच्या कार्याला सलाम करून एक प्राथमिक शिक्षक काय करू शकतो याचा अभिमानाने उल्लेख केला. शिक्षक अधिकारी वर्ग रिजकीय नेते, समाज बाधवानी लेखकाला पाठबळ दिल पाहिजे असे आव्हान केले.
         माण देशातू मुबई शहरात जाऊन  स्थिरावलेल्या अनेक उच्चशिक्षित मंडळीनी शुभेच्छा दिल्या. कल्याण परिसरातील अनेक  शिक्षक वर्ग अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला