साताऱ्यात १७ वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

सातारा : साताऱ्यातील यशवंत हॉस्पिटलजवळ असलेल्या किटली चहाच्या समोर एका १७ वर्षीय मुलावर कोयत्याने व स्टंपने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी ०६.३० च्या दरम्यान घडला. या हल्ल्यात १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर प्रथम साताऱ्यातील खासगी रुग्णालयात आणि पुढे पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणाची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून एकूण ४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील २ अल्पवयीन मुलांसह एकाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी सायंकाळी ०६.३० च्या सुमारास यशवंत हॉस्पिटलशेजारील किटली चहा या ठिकाणी १७ वर्षीय मुलगा उभा असताना एकमेकांकडे बघण्याच्या रागातून व पूर्वीच्या वादातून चौघाजणांनी त्याच्यावर कोयत्याने उजव्या हाताच्या मनगटावर आणि लाकडी स्टंपने डोळ्यावर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सदरचा युवक हा गंभीर जखमी झाला असून हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. युवकाच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तिघा जणांना ताब्यात घेतले असून त्यातील दोघेजण अल्पवयीन आहेत. अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला