डॉल्बी आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई करणार
डॉल्बी कारवाईवर प्रशासन ठामओमकार सोनावणे
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
- बातमी शेयर करा
एक बेस अन् एक टॉप लावून डेमो बैठक सुरू असताना पोलिस दलाच्या वतीने 1 बेस व 1 टॉप लावून डेसिबल मोजण्याचा डेमो देण्यात आला. त्यावर अधिक डेसिबल झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कोणीही आवाजाचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचे प्रात्यक्षिक प्रशासनाने दिले.
सातारा : जिल्हा शांतता कमिटीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत डॉल्बीच्या आवाजाच्या डेसिबलचा डेमो देत गणेशोत्सव काळात त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराच जिल्हा प्रशासनाने दिला. डॉल्बी लावावी, असा एक गट मागणी करत असताना डॉल्बी लावू नये, असे सुचवताच बैठकीतच तणातणी होऊन गोंधळ उडाला. दरम्यान, सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा असून ती जोपासली जावी, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
पोलिस करमणूक केंद्रामध्ये शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे, तहसीलदार राजेश जाधव, मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.
शांतता कमिटीच्या बैठकीच्या सुरुवातीला उपस्थितांना सूचना करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने सर्वांनीच 2 बेस व 2 टॉपला परवानगी मिळावी. तसेच डेसिबल म्हणजे काय? डेसिबल मोजण्याची प्रक्रिया कशी आहे? एमएसईबीने जुने डिपॉझिट परत करावीत. जिल्हा शांत आहे म्हणून दाबू नका. गौण खनिज वाहतूक सुरु असलेल्यांवर कारवाई करावी. अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाने विषय सूचवून त्यांना गणराया अॅवॉर्ड द्यावा. कुत्र्यांचा सातार्यात सुळसुळाट असून त्यावर पालिकेने प्रभावी कारवाई करावी. करंजेमधील अतिक्रमण काढावीत. अफलज खान वध देखाव्याला मान्यता मिळावी, अशा मागण्यांसह विविध प्रश्नही उपस्थित करण्यात आले. नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, श्रीकांत शेटे, अरबाज शेख, अॅड. विनीत पाटील, पूजा बनसोडे, हेमंत सोनावणे, संतोष प्रभुणे, चिन्मय कुलकर्णी, मधुकर शेंबडे, गणेश दुबळे यांनी सूचना केल्या.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, दोन वर्षे कोरोना असल्याने उत्सव साजरे झाले नाहीत. यामुळे यंदा आम्हाला नाचायचे आहे, असे म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. उत्सव साजरा होताना सातारा जिल्ह्याच्या परंपरेचा इतिहास असून तो सर्वांनी अबाधित ठेवण्याची गरज आहे. नाव लौकीकाला बाधा येणार नाही, असे कोणतेही कृत्य कोणीही करु नये, असे आवाहनही खासदारांनी केले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, राज्यात 10 वर्षे काम केले आहे. साताराबद्दल खूप ऐकून आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नियम व अटींचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एसपी अजयकुमार बन्सल म्हणाले, डॉल्बी हा गौण विषय असून त्यापेक्षा अधिक इतर महत्वाचे विषय आहेत. कोणताही सार्वजनिक उत्सव साजरा होत असताना महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. स्वागत कमानीला परवानगी नियम व अटींवर दिली जाईल. देखावे करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही, हे तपासले जाईल. यासाठी शिस्त पाळली जावी. कोणतीही धडधड झाल्यास नियमांप्रमाणे कारवाई करणार असल्याचा इशारा एसपी बन्सल यांनी दिला.
यावेळी प्रशासनाच्यावतीने बोलताना पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट म्हणाले, खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे अडथळा येत असून राहिलेली कामे लवकर पूर्ण करणार. कृत्रिम तळी उभारली जाणार आहेत. सातार्यातील काही तळी खासगी असल्याने व न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मर्यादा आहेत. तळी काढताना कमीतकमी खर्च केला जाईल. सातार्यातील उत्खनन सुरु असल्याने त्याबाबत काम थांबवून वाहतूक सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी ध्वनी प्रदुषण म्हणजे काय? त्याबाबतचा कायदा? आवाजाची मर्यादा कुठे, किती असावी याची माहिती दिली.
एक बेस अन् एक टॉप लावून डेमो
बैठक सुरू असताना पोलिस दलाच्या वतीने 1 बेस व 1 टॉप लावून डेसिबल मोजण्याचा डेमो देण्यात आला. त्यावर अधिक डेसिबल झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कोणीही आवाजाचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचे प्रात्यक्षिक प्रशासनाने दिले.
dolbi
ganpati
sataranagarpalika
SataraNagarpalikaNews
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Tue 23rd Aug 2022 05:27 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Tue 23rd Aug 2022 05:27 am











