रस्त्यावरून झालेल्या वादातून वकिलावर पिस्तूल रोखल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

सातारा :  पाणंद रस्त्यावरून झालेल्या वादातून वकिलावर पिस्तूल रोखल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कळंबे (ता. सातारा) येथे हा प्रकार शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली.या प्रकरणी वकील असलेले विजय विष्णू इंदलकर (वय 42, रा. कळंबे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. तर संपत सदाशीव इंदलकर, संपत इंदलकर यांची पत्नी, राजेंद्र परशुराम लावंघरे, अनंत परशुराम लावंघरे, सिद्धेश संपत इंदलकर (सर्व रा. कळंबे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी दि. 15 रोजी सकाळी राजेंद्र लावंघरे यांनी फिर्यादी विजय इंदलकर यांना फोन केला. ‘मी पाणंद रस्ता जेसीबीने खोदून बंद करणार आहे. तू जर इथे आलास तर तुझा मुडदा पाडणार,’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर वकील विजय इंदलकर हे पाणंद रस्त्याजवळ गेले. त्यावेळी ते जेसीबीला समोर आडवे गेले. वरील संशयितांनी त्यांना दमदाटी करून धक्काबुक्की केली.

तर सिद्धेश इंदलकरने काळ्या रंगाचे पिस्तूल वकिलांवर रोखून मी तुला जिवंत सोडत नाही, अशी दमदाटी केली. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या गावकऱ्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. या प्रकारानंतर अॅड. विजय इंदलकर यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक फाैजदार देशमाने हे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त