जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सातारा येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
Satara News Team
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा : स्वच्छ मुख अभियान व जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण व अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. क्रांतीसिह नाना पाटील, जिल्हा रुग्णालय सातारा येथे मौखिक तपासणी तसेच तंबाखू मुक्ती समुपदेशन करण्यात आले.
या शिबिरास १०० रुग्ण उपस्थित होते. उपस्थित रूग्णानां टूथ ब्रश व टूथपेस्ट वाटप व रुग्णांना दाताची काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली. सर्व रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी करून पुढील उपचारास निर्देशित करण्यात आले.
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयीच्या जनजागृतीपर व्हीडिओचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दंतशल्य चिकित्सक डॉ.योगिता शहा व डॉ. अवधूत कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. दिव्या परदेशी जिल्हा सल्लागार NTCP, डॉ. दळवी जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नर्सिंग कॉलेज मेट्रन,डॉ . प्रतीक कोळेकर, डॉ योगिता शाह, दंत सहायक आझम कवारे, दंत आरोग्यक अनिकेत गावडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
संबंधित बातम्या
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Sun 2nd Apr 2023 12:15 pm













