सातारा जिल्ह्यात ‘आय फ्लू’ फैलावतोय
- Satara News Team
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पुणे, मुंबईसह राज्यातील मोठमोठ्या शहरांमध्ये पसरलेली डोळ्यांची साथ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या ‘आय फ्लू’चे संक्रमित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून, दिवसेंदिवस संक्रमण वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६३६ रुग्णसंख्या आहे.
सततचा पाऊस आणि दूषित पाण्यामुळे सध्या किटाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यातच आता डोळ्यांमध्ये किटाणूंचा संसर्ग होऊन अनेकांना डोळ्यांचे आजार जडले आहेत. वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सुरुवातीला पुणेसह मुंबई विभागात डोळ्यांची साथ पसरली. त्यानंतर संसर्ग झपाट्याने वाढत जाऊन ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. डोळ्यांचा संसर्ग सौम्य असला तरी त्याचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यातच काही ठिकाणी शाळकरी मुलांमध्ये डोळ्यांचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्याचे दिसते.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयातही सध्या ‘आय फ्लू’चे रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात पन्नासपेक्षा जास्त रुग्णांवर औषधोपचार केले जात असून, हा आकडा वाढतच असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले.
रुग्णसंख्या ६३६; उपचारात ३७८
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये २७ जुलैपासून आजअखेर डोळे येण्याच्या विषाणूजन्य साथीचे एकूण ६३६ रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यापैकी २५८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
संबंधित बातम्या
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
-
जिल्ह्यात डेंगू पाठोपाठ हत्तीरोगाचे थैमान! 47 रुग्ण सक्रिय
- Tue 8th Aug 2023 06:32 pm
-
सातारा शहरात डेंगू चे आठ रुग्ण,,,८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी
- Tue 8th Aug 2023 06:32 pm