मयताच्या टाळुवरचे लोणी खाणार्‍याने आमची मापे  काढू नये - दिपक देशमुख

खटाव :आमदार जयकुमार गोरे यांनी काल एका मिटींगमधे मायणीच्या देशमुख बंधुंचा उल्लेख करून आम्ही काय करू शकतो, वेळ आली तर तुरूंगातही टाकु शकतो असे वाक्य उद्देषुन विरोधकांना भिती दाखवण्याचा खटाटोप चालु आहे परंतु जयकुमार गोरे आपण काय केले ते जनतेला आत्ताशी कळायला लागले आहे. मयत माणसांचे टाळुवरचे लोणी खाणार्‍याने आमची मापे काढू नये अन्यथा आम्हांला तुमची लायकी जनतेला दाखवावी लागेल असे मत मायणी मेडीकल कॉलेजचे उपाध्यक्ष दिपक देशमुख यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
दिपक देशमुख पुढे म्हणाले की, तुम्ही प्रत्येकवेळा देशमुखावर घसरता तुमची जी आजची कारकिर्द आहे ती केवळ देशमुखांच्यामुळेच आहे हे सर्व तालुक्याला माहित आहे. गेल्यावेळेस तुम्ही किती मताने निवडूनआला हे ध्यानात ठेवा, केवळ डॉ.एम.आर.देशमुख यांच्यामुळेच तुम्ही आमदार झाला आणि त्याच डॉ.एम.आर.देशमुखांच्या संस्था बळकावण्यासाठी तुम्ही देशमुखांना तुरूंगात डांबले ते सर्व जनता जाणून आहे. मायणीचे देशमुख लेचेपेचे नाहीत मेडीकल कॉलेजच्या जीवावर तुम्ही पैसे कमवून (कोवीड घोटाळा, स्टॅम्प ड्युटी घोटाळा) करूनच आलीशान गाड्या आल्या ते आम्ही आता जनतेला पुराव्यानीषी दाखवून देणार आहे.तुमचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार.
            तुम्हांला वाटत असेल देशमुखांना ई.डी (खोटे गुन्हे) लावुन तुरूंगात डांबले म्हणजे आम्ही खचून जावून तुमच्याकडे मिटवायला येवू असे वाटले असेल परंतु आम्ही खचणार्‍यातले नाही. उलट आपणच दहा वेळा मिटवण्यासाठी निरोप पाठवला होता याचा अर्थ असा होतो की, आपल्या पायाखालची वाळू सरकली असून आपण तोंडगशी पडणार हे नक्की.तुम्ही सदरची संस्था फुकट मिळत नाही असे लक्षात आलेनंतर चालु
असलेली संस्था बंद पाडण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करून पर्यायी शासकीय अधिकारी यांना दमदाटी करून ऐनकेन पध्दतीने संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न केला, त्या संस्थेच्या जीवावर शेकडो कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असल्यामुळे शेवटी नियतीलाते मान्य नव्हते म्हणूनच संस्था बंद पाडण्याचा केलेला खटाटोप निष्पळ
झाला. आज तुमच्याकडे खटाव माणमध्ये दिसण्यासारखा एकही उद्योगधंदानसताना तुम्ही कालच्या भाशणात म्हणाला की, मी माझ्या उद्योगधंद्याच्या व्यवसायातुन मी आलीशान गाड्या घेतल्या ते तुम्ही
 खटाव माणच्या जनतेला सांगावे की नक्की तुमचे उद्योगधंदे काय आहेत व आत्तापर्यंत तालुक्यातील तरूणांना किती रोजगार दिला हे तुम्ही उघड सांगावे, त्याउलट तालुक्यात सुरू असलेले उद्योगधंदे संस्था कशा बंद पडतील यासाठी सरकार दरबारी ताकद लावून प्रयत्न करताय हे सर्व आम्ही जनतेसमोर मांडणार आहे. माण तालुक्यातील होवू घातलेल्या एका साखर कारखान्याचे
काम तुम्ही एका वरिष्ठ नेत्याच्या ताकदीचा वापर करून बंद पाडले त्या कारखान्यात शेकडो तरूणांना रोजगार मिळणार होता याचे पाप आपल्या माथ्यावरच असणार आहे. हीच बेरोजगार राहिलेली तरूण पिढी तुम्हांस राजकरणातुन एक दिवस सन्यांस घ्यायला लावतील हे नक्की.
जयकुमार गोरे आम्ही देशमुख म्हणजे वाघाचे बछडे आहोत भले ते मायणीचे असो, निमसोडचे असो किंवा लोधवडेचे असो. इथुन पुढे देशमुखांच्या नादाला लागाल तर तुमची राजकीय कारकिर्द संपविल्याषिवाय गप्प
बसणार नाही, हा तुम्ही आमचा इशारा समजावा.
येणार्‍या काळात संजय राऊत साहेबांच्या रिकाम्या कोठडीत कोण जातयं हे लवकरच खटाव माणच्या जनतेला पहायला मिळेल. मायणी मेडीकल कॉलेजच्या
कोवीड काळातील मयत लोकांना जीवंत दाखवून कोठ्यावधी रूपयांचा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढून आपली रवानगी लवकरच ई.डी कोठडीत होईल याची पुरेपुर आम्ही तजबीज केलेली आहे. तुम्हांला वाटत
असेल की, सरकार माझे आहे, माझे कोणी वाकडे करू शकणार नाही, परंतु आमचा न्याय व्यवस्थेवर परिपुर्ण विश्वास असून लवकरच न्याय व्यवस्थेच्या माध्यमातुन
तुम्हाला आतमध्ये व्यायाम करण्याची संधी उपलब्ध करून देणार.
एका आय.ए.स अधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याला तुम्ही एकेरी भाषेत उल्लेख करताय हे तुम्हांला शोभणारे नाही. आपण लोकप्रतिनीधी आहात. आपले शिक्षण किती आपण बोलतोय किती., याचे येथून पुढे भान ठेवावे,
अन्यथा खटाव माण मधील जनता आपल्याला आपली जागा दाखवुन देईल.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त