'टेंडर किंग'ने प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेचे ज्ञान घ्यावे अविनाश कदम; सूर्यावर थुंकाल तर स्वतःचेच तोंड भरवून घ्याल
Satara News Team
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरात विविध भागात पाहणी करून नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विविध विकासकामे मार्गी लावतात. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार ७ कोटी २० लाखाची कामे आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेवरूनच मंजूर झाली आहेत. हे पचनी न पडल्यानेच सातारा पालिकेतील 'टेंडर किंग'ने गरळ ओकून सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि स्वतःचेच तोंड भरवून घेतले. या 'टेंडर किंग'ने विकासकामांचे प्रस्ताव कसे मंजूर होतात याचे ज्ञान आधी घ्यावे, असा टोला माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी लगावला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत शहरातील विविध विकासकामे मंजूर होणेसाठी दि. १० मे २०२३ रोजी जिल्हा नियोजन समितीला लेखी पत्र दिले होते. त्यानुसार सदरची कामे मंजूर होऊन निधी उपलब्ध झाला आहे. कोण विकासकामे मार्गी लावतंय आणि कोण नुसतंच थापा मारतंय, हे सर्व सातारकरांना चांगले कळून चुकले आहे आणि त्यामुळेच आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. 'माझं ते माझं आणि तुझं ते बी माझंच' अशी वृत्ती असणाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल व्हावी यासाठीच वृत्तपत्रातून बातमी देण्याचा कुटील डाव खेळाला पण, सातारकरांना डोळे मिटून दूध पिणारे मांजर कोण? हे चांगलेच उमगले आहे. त्यामुळे चोरांनी उलट्या बोंबा मारण्याने काहीही फरक पडणार नाही.
टेंडरसाठी पालिकेत कळवंडी करणाऱ्यांनी विकासकामे कशी मंजूर केली जातात, त्यासाठी प्रस्ताव देऊन हे प्रस्ताव शासकीय प्रक्रियेने मंजूर कसे होतात याचे ज्ञान घेतले पाहिजे. केवळ टेंडरसाठी भांडणाऱ्यांनी प्रस्तव मंजुरीची प्रक्रिया काय आहे, याचा अभ्यास करून मग एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलणे अपेक्षित आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्याबद्दल बोलताना आपली पात्रता काय? आपण बोलतोय काय? याचे भान ठेवले पाहिजे. शेवटी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कराल तर स्वतःचेच तोंड भरवून घ्याल, याचेही भान 'टेंडर किंग' ने ठेवले पाहिजे, असा टोला कदम यांनी लगावला आहे. दरम्यान, पुराव्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले लेखी पत्र प्रसिद्धीसाठी देत असून झोपेचे सोंग घेणाऱ्या विरोधकांचे यानिमित्ताने का होईना डोळे उघडतील हीच अपेक्षा, अशी उपरोधात्मक टीकाही कदम यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 3rd Aug 2023 05:39 pm













