रानगेघर ता.जावली येथे शिवजयंती उत्साहात साजरी

सातारा : रानगेघर ता. जावळी येथे जगदंब युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ रानगेघर यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने  सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली. गेली १२ वर्षे हा उत्सव साजरा करण्यात येतो. विशेष करून एक दोन वर्षांपासूनच्या कोरोना महामारी नंतर या वर्षी उत्स्फूर्तपणे  शिवजयंती साजरी करण्यात आली.
किल्ले श्री प्रतापगड ते रानगेघर अशी शिवज्योत पायदळी पळवत सकाळी 10.00 वाजता आनण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता शिवज्योत व छत्रपतींची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात,  पारंपारिक पद्धतीने ढोल लेझीम,  तसेच जि.प.शाळा विद्यार्थांच्या झांज पथकाने सादरीकरण करत उत्साहात पार पडली.रात्री साडेनऊ नंतर सांस्कृतिक कलागुनाणा प्रोत्साहन देण्यासाठी साठी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामपंचायत रानगेघर सरपंच तसेच माजी सैनिक यांच्या हस्ते  महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सांस्कृतीक कार्यक्रमाची सुरुवात झाली.  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना  अभिवादन करण्यात आले. लहान मुलं, तसेच तरुण वर्गाने यांत सहभाग घेऊन कार्यक्रमाला शोभा वाढवली.कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ, महिला, मुंबईकर तरुण मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला