खटाव तालुक्यातील चोराडे ते मायणी मुख्य रस्त्यांची चाळण

खटाव तालुक्याचे २५ वर्षे नेतृत्व करणाऱ्या गावाला जाताना वाहनचालकांची कसरत; अपघातात वाढ

पुसेसावळी : सततच्या रिमझिम  पावसामुळे खटाव तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून अनेक मार्गांवर ''खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा''असा अनुभव प्रवासी आणि वाहन चालकांना येत आहे. चोराडे चौक ते मायणी पर्यंत रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे, 
खटाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. परंतु खटाव तालुक्याचे २५ वर्षे आमदारकी म्हणजेच नावाला असलेले लोकप्रतिनिधी पदाचे नेतृत्व ज्या मायणी गावातून करण्यात आले. त्या गावाला जाण्यासाठी शरिराचा खुळखुळा करावा लागतो. हि निंदनीय बाब आहे.
     त्यामुळे रस्ते कामाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दररोज या रस्त्यावरील खड्ड्यां मध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून एका पावसाळ्यात  रस्ते खराब झाल्याने ठेकेदाराच्या कामाचा दर्जा तसेच मर्यादा स्पष्ट होत आहेत. त्यामुळे वाहनचालकामध्ये संतापाची लाट उसळली असुन ठेकेदारासह पेन्शन धारक माजी आणि आजी आमदारांवरही कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
       पंढरपुर कडे जाणारा मार्ग असल्यामुळे या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक असते. तरी या रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्यावरून खड्ड्यांमुळे चालणे शक्य होत नाही. या रस्त्यावरुन पादचारी लोकांनाही या खड्डयांचा त्रास जास्त प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला एखादा मोठा अपघात पाहणे अपेक्षित आहे कि काय हाही प्रश्न या - निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. तरी संबंधित ठेकेदारासह पेन्शन धारक माजी आणि आजी आमदारांवरही त्वरित कारवाई करून रस्त्यातील खड्डे मुजविण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.

खटाव तालुक्याचे त्रिभाजन रद्द करून पुर्ववत मतदार संघाची आवश्यकता
 खटाव तालुक्याला तीन आमदार आहेत. २००९ साली खटाव मतदार संघाचे राजकीय दुर्बल नेतृत्व पाहून त्रिभाजन केले गेले,तालुक्यात सामर्थ्यवान राजकीय नेता अस्तित्वात नसल्याने खटाव मतदार संघ जाणीवपूर्वक नष्ट केला गेला, व शेजारच्या तीन विधानसभा मतदार संघात जोडण्यात आला.आता विद्यमान आमदार जयकुमार गोरेंचे नेतृत्व असलेले माण (वडुज भाग), विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व असलेले कराड उत्तर (पुसेसावळी भाग) आणि विद्यमान आमदार महेश शिंदेंचे नेतृत्व असलेले  कोरेगाव(खटाव भाग) मधील ३ आमदारां वरती खटावची जादा जबाबदारी दिली गेली आहे. या आमदारांना हा भाग त्यांच्या मतदार संघाला जोडून पण निधी पूर्वी येवढाच कमी मिळतो त्यामुळे हा वाढीव जोडलेला अविकसित आणि दुर्लक्षित भाग विकासापासून दूरच आहे. खटाव मतदार संघ त्रिभंगून तालुक्याचा पुसेसावळी भाग कराड मतदार संघाला, खटाव भाग कोरेगाव मतदार संघाला आणि वडूज भाग माण मतदार संघाला जोडला आहे. या मतदारसंघांची पुनर्रचना पूर्वीसारखी होणे गरजेचे आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला