पुसेसावळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ चे घवघवीत यश

कळंबी येथे क्रांतीसिंह नाना पाटील जयंती निमित्त केंद्रस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन

पुसेसावळी : क्रांतीची सिंहगर्जना करणारे महान क्रांतिकारक मा.क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या केंद्रस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा जि.प. प्राथ. केंद्र शाळा कळंबी येथे पार पडल्या. कळंबी केंद्रातील सर्व शाळांच्या एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुसेसावळी नं.२ येथील विद्यार्थिनींना वक्तृत्व आणि निबंध स्पर्धे घवघवीत यश मिळाले.त्याबद्दल सर्व शिक्षक,शिक्षिका,पालक आणि ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.
      निबंध स्पर्धेचे गुणवंत विद्यार्थी 
लहान गट: - मुलीं मध्ये प्रथम क्रमांक कु.समृद्धी संजय खताळ, यशवंतनगर शाळा नं.२, तृतीय क्रमांक कु.आरोही संतोष सुर्यवंशी, लांडेवाडी आणि कु.तनुश्री नाथा कंठे, पारगांव,  लहान गट:- मुलां मध्ये प्रथम क्रमांक कुणाल शहाजी करे, कळंबी, द्वितीय क्रमांक आयुष सागर येवले, वडी, आणि तृतीय क्रमांक आर्यन अमोल खोत, यशवंतनगर शाळा नं.२ 
मोठा गट:- मुलींमध्ये प्रथम क्रमांक कु.तेजस अनिल येवले, वडी, द्वितीय क्रमांक कु.अस्मिता बाबासाहेब माने,कळंबी आणि तृतीय क्रमांक कु.ज्ञानेश्वरी मारूती देवकर हिने मिळवला मोठा गट:- मुलांमध्ये प्रथम क्रमांक समर्थ विलास घाडगे, कळंबी, द्वितीय क्रमांक वेदांत सचिन ढोले, कळंबी आणि तृतीय क्रमांक समर्थ हेमंत शिंदे याने मिळवला.
        वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी
लहान गट: - मुलीं मध्ये प्रथम क्रमांक कु.श्रुती अमोल गुरव, पुसेसावळी शाळा नं.२, द्वितीय क्रमांक कु.जान्हवी शशांक गुरव, पुसेसावळी शाळा नं.२ आणि तृतीय क्रमांक कु.अनुष्का गौतम खरात,कळंबी,  
लहान गट:- मुलां मध्ये प्रथम क्रमांक रूद्रनिल संतोष कदम, यशवंतनगर शाळा नं.२, द्वितीय क्रमांक उजेर आशपाक बागवान, यशवंतनगर शाळा नं.२, आणि तृतीय क्रमांक आर्चित अमोल खोत, यशवंतनगर शाळा नं.२ 
मोठा गट:- मुलींमध्ये प्रथम क्रमांक कु.प्रियांशी सुनिल वाघमारे, पुसेसावळी शाळा नं.२, द्वितीय क्रमांक कु.अस्मिता महेंद्र फडतरे, लांडेवाडी आणि तृतीय क्रमांक कु‌.ज्ञानेश्वरी मारूती देवकर, पुसेसावळी शाळा नं.२ हिने मिळवला.
         सदर स्पर्धेस श्री.थोरवे सर, श्री.भंडारे सर, श्री.करंडे सर, श्री.फडतरे सर, श्री.राऊत सर, श्री.आळे सर इत्यादींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर केंद्रप्रमुख मा.मोहन साळुंखे, गटशिक्षणाधिकारी मा.भराडे मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली या स्पर्धा पार पडल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला