सिध्दनाथ यात्रेनिमित्त गजीनृत्यासह बैलगाडी शर्यतीचा धुरळा व जंगी कुस्त्यांचे मैदान

On the occasion of Siddhanath Yatra, there is a bullock cart race with gaji dance and a wrestling ground.

माण : माण तालुक्यातील पळसावडे येथील ग्रामदैवत सिध्दनाथ देवस्थान हे पंचक्रोशीतील लाखो भाविकाचे श्रध्दास्थान आहे. हे एक जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा देव आहे, सालाबाद प्रमाणे श्री सिध्दनाथ देवाच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १९ ते रविवार दि. २२ ऑगस्ट पर्यत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पळसावडे ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीनी दिली आहे. यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. एक आदत एक बैल भव्य बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.  शनिवार दि २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. गजीनृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रविवार दि.२१ रोजी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी श्री सिद्धनाथ देवाचा नैवेद्य चा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दु. ३ वा. भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. रात्री ९ वा. कोल्हापूर येथील रजनी गोरड यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पळसावडे येथे प्रथमच बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे. ७ हजार रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंत बक्षीस लावण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिह जगताप यांच्या वतीने लावण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्षीस माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम शिंगाडे व माणगंगा सोसायटीचे संस्थापक माजी चेअरमन कुंडलिक यादव यांच्या वतीने लावण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस देवापूरचे सरपंच शहाजी बाबर व ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब औताडे यांच्या वतीने लावण्यात आले. चौथ्या क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस सिध्दनाथ शेंडगे ( PSI ) , सुशांत सरतापे (CISF ), आण्णा काटे (फौजी) , मयुर सरतापे ( फौजी) यांच्या वतीने लावण्यात आले आहे. पाचव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस पांडुरंग पिसाळ यांच्या वतीने लावण्यात आले आहे. सहाव्या क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे बक्षीस सुरेश बाबर यांच्या वतीने लावण्यात आले आहे. तर सातव्या क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे बक्षीस काकासो यादव यांच्या वतीने लावण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व विजेत्या बैलगाडी मालकांना कै.आप्पा संभा व्हरकाटे यांच्या स्मरणार्थ ढाल देण्यात येणार आहे. या कुस्ती मैदानात ५० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत इनामाच्या कुस्त्या होणार आहेत. प्रथम क्रमांकाची कुस्ती १ लाख रुपयांची पै. महारुद्र काळेल विरुद्ध पै. विक्रम पारखी यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती ७५ हजार रुपयांची पै.विक्रम भोसले विरुद्ध पै. सतपाल सोनटक्के यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती ५१ हजार रुपयांची पै. महादेव माने विरूद्ध पै. अमित सुळ यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती २५ हजार रुपयांची पै. गणेश जाधव विरुद्ध पै.शांतीलाल सरवदे यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती १५ हजार रुपयांची पै. धनाजी मगर विरुद्ध पै. अमोल नरळे यांच्यात होणार आहे. सहाव्या क्रमांकाची कुस्ती १० हजार रुपयांची पै.अक्षय मासाळ विरुद्ध पै. संदीप पाटील यांच्यात होणार आहे तर सातव्या क्रमांकाची कुस्ती ७ हजार रुपयांची पै. बालाजी काळे विरुद्ध पै. पै.सोमनाथ शिंदे यांच्यात होणार आहे.
तरी सिध्दनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा भाविकांनी व शौकीनांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त