लायन्स क्लबचे कार्य आदर्शवत : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

The work of Lions Club is ideally : a. Shivendra Singh Raje Bhosale

सातारा  :  लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसी हा त्यांच्या कामातून आणि उपक्रमातुन समाजातील सेवाकार्यात नक्की एक पाऊल पुढे असून त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी क्लबच्या नूतन पदाधिकारी यांच्या पद्ग्रहन समारंभ प्रसंगी केले यावेळी माजी प्रांतपाल लायन उदयजी लोध, प्रथम उप प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर, रिजन चेअरमन  लायन डॉ महेश खुस्पे, झोन चेअरमन लायन मोहनशेठ पुरोहित, मासचे अध्यक्ष लायन राजेंद्र मोहिते,क्लबचे नूतन अध्यक्ष लायन बाळासाहेब महामुलकर सातारचे तहसीलदार राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते "आम्ही सेवा करतो" या लायन्स च्या घोष वाक्यांनुसार येणाऱ्या काळात नूतन अध्यक्ष बाळासाहेब महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मिशन आरोग्य ,शिक्षण आणि पर्यावरण यामध्ये अतिशय चांगले काम होईल अध्यक्ष बाळासाहेब महामूलकर यांचा सर्वांशी असणारा संपर्क आणि सबंध या माध्यमातून चांगले सेवाकार्य होईल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. 
   क्लबने कोविड संकटकाळात ऑक्सिजन मशीन,लसीकरण, तसेच नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून अनेकांना सेवा दिली आहे त्याचा समाजातील अनेकांना फायदा झाला आहे अश्या क्लबला कायमच माझे सहकार्य असेल  असे ही आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले माजी प्रांतपाल लायन उदयजी लोध यांनी अध्यक्ष लायन बाळासाहेब महामुलकर सचिव लायन कुलदीप मोहिते खजिनदार लायन सचिन साळुंखे उपाध्यक्ष लायन केतन कोटणीस व पदाधिकारी व नवीन सदस्य यांना लायन्स कार्याची ची शपथ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लायन्स ची पिन देऊन क्लबचे सन्मानिय सदस्य म्हणून  लायन्स क्लब परिवारात स्वागत केले यावेळी प्रथम उप प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर, रिजन चेअरमन  लायन डॉ महेश खुस्पे, झोन चेअरमन लायन मोहनशेठ पुरोहित यांनी मनोगत व्यक्त केली तसेच  उल्लेखनीय कार्यासाठी क्लबच्या माजी अध्यक्ष यांचा व मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सातारा च्या विविध पदांवरती निवड झाल्याबद्दल क्लबच्या वतीने सन्मानपत्र देऊन  त्याच बरोबर रिजन मधील उपस्थित असलेल्या पदाधिकारी यांचा सत्कार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष लायन आनंदा गायकवाड यांनी केले क्लबचा अहवाल लायन प्रसाद देशमुख मांडला सूत्र संचालन लायन शिवाजीराव फडतरे, लायन कीर्ती तोडकर, वृषाली गायकवाड यांनी केले आभार लायन कुलदीप मोहिते यांनी मानले...यावेळी जेष्ठ मार्गदर्शक  लायन प्रभाकरजी आंबेकर,  लायन धैर्यशील भोसले , झोन लायन दिलीप वाहळकर,लायन डी वाय पाटील, लायन संजोग मोहिते, लायन युवराज जाधव ,राजकुमार पाटील , अजिंक्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ मोटे, शशिकांत पारेख, , प्रतापगड  साखर कारखान्याचे संचालक नाना पवार, डॉ जयदीप चव्हाण,शिवाजी कदम ,आशुतोष चव्हाण,निलेश निकम,श्रीराम राजमाने, आदी प्रतिष्ठित नागरिक व रिजन मधील अनेक लायन्स क्लबचे सद्स्य मोठया संख्येने उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला