दिनांक 17 रोजी झेंडा मिरवणुकीने पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यात्रेस प्रारंभ

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा रथउत्सव सोहळा येत्या 22 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे श्री सेवागिरी महाराजांच्या 75 व्या पुण्य स्पर्धा निमित्त श्री सेवागिरी अमृत महोत्सव सोहळा उत्साहात साजरा होत असून 17 ते दिनांक 27 डिसेंबर दरम्यान पुसेगाव येथे वार्षिक यात्रा प्रदर्शन मोठ्या दिमाखात भरवण्यात येणार असल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव यांनी दिली 
     देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 17 डिसेंबर रोजी झेंडा मिरवणूक केली यात्रेला प्रारंभ होणार असून दिनांक 14 ते 17 डिसेंबर दरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 17 व 18 डिसेंबर रोजी गावाची श्री हनुमान गिरी हायस्कूलच्या मैदानावर अखिल भारतीय दिवस रात्र खुल्या राष्ट्रीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 20 डिसेंबर रोजी जंगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 21 डिसेंबर रोजी कैलासवासी नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात 51 हजार रुपयांपासून एक लाख 51 हजार रुपये पर्यंत कुस्त्या होणार आहे दिनांक 20 डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी सजलेल्या रथातून मिरवणूक निघणार आहेत दिनांक २१ ते २६ डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजता जिल्हास्तरीय खुला युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे दिनांक 25 डिसेंबर रोजी बक्षीस जनावरांची नोंद व दिनांक 26 रोजी बक्षीस पात्र जनावरांची निवड होणार आहे 27 रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे यात्रेकरूंच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली असून या चला सुरू होण्यापूर्वी दुकानदारांनी आपली जागा दहा दिवसापूर्वी आरक्षित करणे गरजेचे आहे 12 डिसेंबर पासून जागेचे आरक्षण सुरू होणार असून संबंधित दुकानदाराने त्याची नोंद घ्यावी.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला