तब्बल वीस वर्ष आमचा राजवाडा बंद आहे. सरकारने तात्काळ राजघराण्याकडे हस्तांतरित करावा! ... दीपक पवार

सातारा : अत्यंत लाजिरवाणी आणि शरमेची बाब आहे गेली वीस वर्ष राजवाडा बंद आहे याला लोकप्रतिनिधी अथवा सरकार यांना मी दोष देणार नाही त्याला जबाबदार फक्त सातारकर नागरिक आहेत. जगाच्या इतिहासाबद्दल बोलतात लिहितात आणि सातारा शहराबद्दल एक आवक्षर देखील काढत नाहीत किंवा लिहीत नाहीत याच्या इतकं दुर्दैव काही नाही.
इंग्रजांनी देशामध्ये अनेक राजघराण्याचे राजवाडे जमीन जुमला दाग दागिने हे बळकावून घेतलेले परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हेच राजवाडे ज्या त्या राजघराण्याच्या वारसांडे हस्तांतरित करण्यात आले मग ते काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वांचे राजवाडे परत हस्तांतरित करण्यात आले पटियाला असेल उदयपूरचे असतील ग्वालियरचे असतील होळकरांचे असतील म्हैसूरचे असतील किंवा आमच्या कोल्हापूरचे असतील इथले सर्व राजवाडे तिथल्या राजघराण्याला परत करण्यात आले. मग आमचा साताऱ्याच्या राजधानीचा राजवाडा हा इथल्या राजघराण्याला हस्तांतरित करण्यात का आला नाही?
सातारा जिल्ह्यातील प्रत्येकाची आपुलकी आणि भावना या राजवाड्याशी जोडलेली आहे. सातारकरांचे तर राजवाडा ही अभिमानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही राजवाड्यांमध्ये शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, तहसील कार्यालय, अथवा शासकीय कार्यालय मोठ्या प्रमाणामध्ये होती.  परंतु एक ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याची जपणूक फारशी झालेली नाही. मग आमची मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्याच्या राजवाड्याची अशी दूर अवस्था का? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर का शासनाने आपल्या ताब्यामध्ये हा राजवाडा घेतला असेल तर गेली (वीस वर्ष) आमच्या राजवाड्याची हेळसांड व दुरावस्था याला जबाबदार कोण. मला माहिती नाही पण साताऱ्यामध्ये कोणालाही एवढी मोठी मजबूत आणि देखणी वास्तू उभी करता येणार नाही. मग आम्ही सातारकर त्याचे वारीस आहोत त्याची जपणूक करणं हे आमचे कर्तव्य असताना, तिथे डोळ्यादेखत दारुडे, गर्दुले, व भुरटे चोर ऐतिहासिक वस्तूंची चोरी करताना दिसत आहेत. चोरी पडझड आणि अतिशय  हे सगळं होत असताना ज्यांच्या ताब्यात हा राजवाडा आहे ते आम्हाला काय उत्तर देणार आहे?
सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये या राजवाड्यामध्ये शाळा अथवा कुठल्याहि संस्थेला वाड्याचा भाग देऊ नये आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये कुठल्याही भोंगळा अवस्थेला जबाबदार राहू नये. जर का हा राजवाडा छत्रपती शिवरायांच्या वारसांना दिला तर तो एक प्रकारे त्यांचे वंशज शिवरायांचे प्रतीक म्हणून योग्य ती काळजी घेतील. असा मला विश्वास वाटतो. देशातील शेकडो संस्थानिकांना जर का आपण त्यांच्या वारसदारांना त्यांचे राजवाडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दिले असतील, तर आमच्या साताऱ्याचा राजवाडा देण्यामध्ये सरकारला कोणती अडचण आहे? किमान हा वीस वर्ष पडत चाललेला राजवाडा नागरिकांसाठी ऐतिहासिक वारसा म्हणून खुला होईल. दुर्दैव एका बाबीचे आहे गेली वीस वर्ष हा राजवाडा बंद आहे. त्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही किंवा स्थानिक जनतेने जन आंदोलन देखील केले नाही पण आता याच्यासाठी जर का आपण गप्प राहिलो आणि सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्या तर आपल्या डोळ्या देखत राजवाड्याची दयनीय दुरावस्था पहावी लागेल

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला