पुसेगाव पोलीस प्रशासनाच्या बेजबाबदार व हलगर्जी कारभाराचा यात्रेकरू व ट्रस्टला मोठ्या त्रासाचा करावा लागला सामना

 पुसेगाव: महाराष्ट्रसह कर्नाटक तसेच राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी यात्रा विविध कार्यक्रमाने संपन्न झाली यामध्ये लाखो भाविकांनी उपस्थिती दाखवली होती यात्रेला भाविकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभाराचा श्री सेवागिरी महाराज यात्रेस व देवस्थान ट्रस्टला चांगलेच त्रासाला सामोरे जावे लागले   असल्याचे देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव सह विविध मान्यवर व ग्रामस्थांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.
   या यात्रेमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बरेच वेळा निर्माण होऊन देखील पोलीस बघ्यांच्या भूमिका घेत होते. दहा ते पंधरा लाख भावीक या यात्रेमध्ये हजर होते. असे असताना देखील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता काही समाजविघातक व्यक्ती, आणि गुन्हेगार यांचे कडून गर्दीत अनेक ठिकाणी बेकायदेशीर वर्तन होऊन देखील कुठेही पोलीस प्रशासनाचा वचक आणि नियंत्रण दिसून आले नाही. त्यामुळे देवस्थान चेअरमन सह ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त केले आहे. पोलिसांनी पुसेगाव यात्रेदरम्यान फक्त आणि फक्त चौकच धरले होते, एवढा मोठा पोलीस फौजफाटा असताना देखील संपूर्ण यात्रेमध्ये पोलीस कुमक जागोजागी  ठेवण्याची गरज होती पण तसे काही दिसून आले नाही परंतु केवळ  बघ्याच्या भूमिकेशिवाय, पोलीस प्रशासनाने ठोस अशी पावली उचलून बेकायदेशीर वर्तन करणाऱ्यांना नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. मग पोलीस का कमी पडले  व कशासाठी असे अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण झालेले असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात होते. यात्रेमध्ये पाळण्याच्या ठिकाणी हुल्लडबाज तरुणांनी हुल्लड बाजी करून कुठलंही सामाजिक किंवा भाविकाचे उत्स्फूर्तमय व आनंदी  वातावरण गढूळ होऊ नये म्हणून जर वर्षी या ठिकाणी पोलीस राहूट्या  तंबू उभारले जातात परंतु यावर्षी तिथे तसे काही दिसून आले नाही, येणाऱ्या व्यावसायिक यात्रेकरूंना गुंड प्रवृत्तीच्या तरुणांच्या कडून कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ही जागोजागी पोलिसांची निगराणी असणे गरजेचे होते. तसेच वाहतूक नियंत्रण करताना वाहतूक नियंत्रण पूर्ण व्यवस्थितरित्या फिरवता आली नाही, वाहतुकीचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला, ही सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असताना केवळ होमगार्ड चा उपयोग करून जबाबदारी पासून मुक्ती घेतल्याचे चित्र दिसत होते सदर याबाबत या सर्व गोष्टी अनुसरून पोलीस प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज पोलिसांना वाटते का असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पुसेगाव शहर अध्यक्ष राम जाधव सह नागरिकांच्या प्रतिक्रिया 
[ पुसेगाव व परिसरातील नागरिकांतून पुसेगाव यात्रेतील पोलीस प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कायदा व सुव्यवस्थेसाठी होमगार्ड वर जबाबदारी टाकून स्थानिक पोलीस प्रशासनाने हात झटकल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.]

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त